Ratnagiri : रत्नागिरीत ७७ हजार ५०० रुपयाचा ब्राऊन हिरोईन सदृश पदार्थासह एकाला पकडले

Ratnagiri : रत्नागिरी शहरात गस्त घालत असताना रत्नागिरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जयस्तंभ येथे ७७ हजार ५०० रुपयाचा ब्राऊन हिरोईन सदृश पदार्थासह एकाला ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रत्नागिरीत रामनवमी उत्सवाच्या अनुषंगाने शहरात गस्त घालत असताना जयस्तंभ येथील खाना खजाना हॉटेल ठिकाणी एक इसम एका दुचाकी वाहनावर संशयित हालचाली करीत असताना दिसून आला. त्याचा संशय आल्याने त्याच्या ताब्यातील पिशवीची खात्री करण्याकरिता दोन पंचांना समक्ष बोलावून पोलिसांनी तपासणी केली.

तेव्हा त्याच्याकडे असलेल्या पिशवीमध्ये ब्राऊन हिरोईन सदृश्य अंमली पदार्थच्या पुड्या मिळून आल्या. या पुड्याचे वजन करता ०.४ मिली ग्रॅम वजनाचा ब्राऊन हिरोईन सदृश्य अंमली पदार्थ सापडला. याप्रकरणी आरोपी आदिल अश्रफ शेख (वय ३०) रा. गोळप सडा ता.जि. रत्नागिरी ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ७७ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply