Ratan Tata Successor: रतन टाटा यांचा उत्तराधिकारी कोण असेल? ज्याच्या हातात असेल देशातील सर्वात प्रतिष्ठित समूहाची धुरा

Ratan Tata : प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचे निधन झालं आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. व्यवसायासोबतच त्यांनी सामाजिक कार्यातही मोठं योगदान दिलं. आपल्या सामाजिक कार्यामुळे ते नेहमीच चर्चेत राहिले आहेत. रतन टाटा याना मुलं नसल्यामुळे त्यांच्या उत्तराधिकारावर अजूनही सस्पेंस आहे. अशातच टाटांच्या ३३.७ ट्रिलियन रुपयांच्या साम्राज्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सावत्र भाऊ नोएल टाटा असतील रतन टाटा यांचे उत्तराधिकारी?

रतन टाटा यांच्या संभाव्य उत्तराधिकारींमध्ये नोएल टाटा हे प्रबळ दावेदार मानले जातात. नवल टाटा यांची दुसरी पत्नी सिमोन यांचे पुत्र नोएल टाटा हे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ आहेत. यामुळेच टाटा वारसा मिळवण्याच्या बाबतीत नोएल टाटा पहिल्या क्रमांकावर येतात, असं बोललं जात आहे.

 

 

मात्र वय लक्षात घेता ही जबाबदारी त्याच्या तीन मुलांपैकी कोणत्याही एका मुलावर दिली जाऊ शकते, अशीही चर्चा आहे. नोएल टाटा यांच्या तीन मुलांमध्ये माया टाटा, नेव्हिल टाटा आणि लिया टाटा यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त रतन टाटा यांचा एक लहान भाऊ जिमी टाटा देखील आहे. जे आतापर्यंत टाटा समूहाच्या कामकाजापासून दूर राहिले आहेत.

नोएल टाटा यांच्या तीन मुलांवर सध्या कोणती जबाबदारी आहे?

मिळालेल्या माहितीनुसार, माया टाटा समूहात लक्षणीय प्रगती करत आहेत. बायस बिझनेस स्कूल आणि युनिव्हर्सिटी ऑफ वॉर्विकमधून शिक्षण घेतलेल्या माया यांनी टाटा अपॉर्च्युनिटीज फंड आणि टाटा डिजिटलमध्ये महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. टाटा नवीन ॲप लॉन्च करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. यावरून त्यांची धोरणात्मक कुशाग्रता आणि दूरदृष्टी दिसून येते.

यातच नेव्हिल टाटा कौटुंबिक व्यवसायात खोलवर गुंतलेले आहेत. टोयोटा किर्लोस्कर ग्रुप कुटुंबातील मानसी किर्लोस्कर यांच्याशी त्यांचे लग्न झाले आहे. स्टार बाजार हे नेव्हिल ट्रेंट लिमिटेडच्या अंतर्गत प्रमुख हायपरमार्केट चेनचे प्रमुख आहे. यात लिया टाटा सर्वात ज्येष्ठ आहेत. त्या टाटा ग्रुपच्या हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये काम करतात. स्पेनमधील आयईमध्ये शिक्षण घेतलेल्या लेया यांनी ताज हॉटेल्स रिसॉर्ट्स आणि पॅलेसेसमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. दरम्यान, पुढील घडामोडी फक्त टाटांच्या कॉर्पोरेट नेतृत्वाचे भविष्य ठरवणार नाहीत, तर देशातील सर्वात प्रतिष्ठित गटाची भविष्यातील दिशाही यातूनच ठरणार आहे.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply