
Prahar Rasta Roko : शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी; या प्रमुख मागणीसाठी आज राज्यभर प्रहार संघटनेकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे. त्याच अनुषंगाने राज्यातील अनेक शहरांमध्ये प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांसोबत शेतकरी देखील रस्त्यावर उतरला आहे. ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. यात नांदेड, नाशिक, अमरावती, वाशीम, शिर्डी, नगर याठिकाणी रास्ता रोको करण्यात आला आहे.
नांदेड- नागपूर महामार्ग रोखला
नांदेड : नांदेड जिल्ह्यात देखील प्रहार संघटना आक्रमक झाली असून नांदेड- नागपूर राष्टीय महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरु केले आहे. शेतकरी कर्जमाफीसह इतर मागण्यासाठी शेतकरी आक्रमक झाले असून शेतकऱ्यांनी दोन तासापासून नांदेड नागपूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला आहे. परिणामी आंदोलनामुळे वाहनाच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत.
नाशिकच्या मेहर सिंगल येथे चक्काजाम नाशिक : शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी प्रहार संघटनेकडून नाशिकच्या मेहेर सिग्नल या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. तसेच कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहातील रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर कोकाट्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील जोर धरत आहे. नाशिक शहरात प्रहार संघटनेकडून शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा या दोन प्रमुख मागण्या घेऊन चक्काजाम आंदोलन केले जात आहे. बॅनर हातात घेऊन प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी केली जात आहे.
|
|
नाशिक-संभाजीनगर महामार्ग रोखला नाशिक : शेतकऱ्यांना कर्जमाफी, हमीभाव, दिव्यांगांना ६ हजार रुपये मानधन या प्रमुख मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यानुसार राज्यात ठीक ठिकाणी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकच्या येवल्यात देखील नाशिक- संभाजीनगर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले. सुमारे एक तास हे चक्काजाम आंदोलन सुरू होते. आंदोलनामुळे महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
वाशिममध्ये प्रहारच्या वतीने रास्ता रोको आंदोलन वाशीम : वाशिममध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शहरातील पुसद नाका येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. शेतकरी कर्जमाफी, शेतमजूर, दिव्यांग, मेंढपाळ आणि मच्छीमार यांच्या विविध मांगण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी अकोला –हैद्राबाद मार्गावर हे आंदोलन करण्यात आलं. जवळपास अर्धा तास चाललेल्या आंदोलनामुळे वाहतूक खोळंबली होती.
कर्जमाफीसाठी प्रहारचा रस्त्यावर एल्गार
शिर्डी (अहिल्यानगर) : शिर्डी शहरात नगर- मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. शेतकरी कर्जमाफी आणि विविध मागण्यांसाठी प्रहारचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. प्रहारच्या आंदोलनाला महाविकास आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, लोक स्वराज्य आंदोलन आणि इतर विविध संघटनांचा पाठिंबा दिला आहे. आंदोलकांनी नगर- मनमाड महामार्ग अडवला असून महायुती सरकार आणि कृषीमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel

