Rashmi Shukla Transfer : मोठी बातमी! पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली

Rashmi Shukla : ऐन विधानसभा निवडणुकीत राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. काँग्रेस आणि इतर पक्षांनी त्यांच्या बदलीची निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेऊन निवडणूक आयोगाने रश्मी शुक्ला यांच्या बदलीचे आदेश दिले. शुक्ला यांची तात्काळ प्रभावाने बदली करण्यात यावी, असे निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना आदेल दिले आहेत.

वरिष्ठ आयपीएल केडरच्या अधिकाऱ्यांची तात्काळ महासंचालक म्हणून नियुक्ती करण्याचे आदेशही निवडणूक आयोगाने दिले आहेत. यासंदर्भात दुपारपर्यंत तीन आयपीएस अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करण्याच्या सूचनाही राज्याच्या मुख्य सचिवांना दिल्या आहेत.

Pune : जमिनीच्या वादातून चुलत भावाला मोटारीखाली चिरडण्याचा प्रयत्न, शिरुरमधील केंदूर गावातील घटना

केंद्रीय निवडणूक आयोगाने (ECI) रश्मी शुक्ला, DGP महाराष्ट्र यांच्या बदलीचे निर्देश दिले आहेत. शुक्ला यांचा पदभार सर्वात वरिष्ठ IPS अधिकाऱ्याकडे सोपवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी तीन अधिकाऱ्यांची समिती स्थापन कऱण्यात आली आहे. दरम्यान, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी काही दिवसांपूर्वी आढावा बैठक घेत राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बाबत नाराजी व्यक्त केली होती. आता त्यांच्या बदलीचे आदेश देण्यात आले आहेत. पण नाना पटोले यांनी त्यावर प्रश्न उपस्थित केला आहे.

रश्मी शुक्ला यांच्या बदलीला इतके दिवस का लागले? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला. त्याशिवाय रश्मी शुक्ला यांची बदली केल्याप्रकरणी नाना पटोले यांनी निवडणूक आयोगाचे आभार व्यक्त केले आहेत. रश्मी शुक्ला या भाजपसाठी काम करत होत्या. निवडणुकीतील फायद्यासाठी सरकारने त्यांना आणलं होतं, असा आरोपही यावेळी पटोले यांनी केला. निवडणुकीच्या कोणत्याही कामात रश्मी शुक्ला यांना ठेवू नये, अशी मागणी यावेळी नाना पटोले यांनी केली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply