Rashmi Shukla : जनतेचा पोलिसांवरील विश्वास कमी झाला

Rashmi Shukla : काही स्तरावर जनतेचा पोलिस दलावरील विश्वास कमी झाला आहे हे स्वत: राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी शुक्रवारी जाहीरपणे मान्य केले. पोलिस दलातील कोणत्याही सदस्याकडून हिंसा, शोषण किंवा गैरवर्तनाची कोणतीही अन्यायकारक कृत्ये खपवून घेतली जाणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला.

पोलिस अधिकाऱ्याकडून न्याय मिळत नसेल तर पोलिस महासंचालक कार्यालयात थेट तक्रार करावी, असे खुले आवाहन करीत यापुढील काळात भूतकाळातील चुका मागे टाकून जनतेचा विश्वास संपादन केला जाईल, असे शुक्ला यांनी सांगितले. राज्याच्या पोलिस महासंचालकपदाचा कार्यभार स्वीकारून रश्मी शुक्ला यांना एक महिना झाला आहे.

Devendra Fadnavis : 'उद्धवजींच्या डोक्यावर परिणाम झालाय, गेट वेल सून...'; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

राज्यात कायदा सुव्यवस्थेवरून विरोधकांनी सरकारला घेरले असताना रश्मी शुक्ला स्वत: मैदानात उतरल्या आहेत. ‘काही स्तरावर जनतेचा पोलिस दलावरील विश्वास कमी झाल्याचे ‘एक्स’वरून प्रसिद्ध केलेल्या आवाहनात त्यांनी सुरुवातीलाच मान्य केले आहे. त्याचबरोबर भूतकाळातील चुका मागे टाकून तुमचा विश्वास परत जिंकणे ही आमची जबाबदारी असल्याची ग्वाहीही दिली आहे.

गैरवर्तन केले तर खबरदार

राज्यात अलीकडच्या काळात पोलिसांवर पक्षपातीपणाचा आरोप होऊ लागल्याने त्याचीही गंभीर दखल रश्मी शुक्ला यांनी घेतली आहे. पोलिस दलातील कोणाकडूनही हिंसा, शोषण किंवा गैरवर्तन केले जात असेल तर खपवून घेतले जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलिस महासंचालक रश्‍मी शुक्ला राज्यातील पोलिसांना दिला आहे. तसेच संबंधिक पोलिस अधिकाऱ्यांकडून त्यांना न्याय मिळत नसेल तर थेट पोलिस महासंचालक कार्यालयात तक्रार करण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले.

रश्‍मी शुक्ला यांचे निवेदन

‘महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाची सुरक्षा सुनिश्चित करणे हे माझे प्राधान्य आहे. आम्ही सेवा करत असलेल्या जनतेचा विश्वास आणि पाठिंबा जिंकल्याशिवाय आमचे कार्य कुचकामी आहे. या गोष्टीची दखल घेणे अत्यावश्यक वाटते की, काही स्तरावर जनतेचा आपल्या पोलिस दलावरील विश्वास कमी झाला आहे.

भूतकाळातील चुका मागे टाकून तुमचा विश्वास परत जिंकणे, ही आमची जबाबदारी आहे. राज्यातील सर्व पोलिस कर्मचारी तुमचे आणि तुमच्या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी तत्परतेने काम करत आहेत आणि करत राहू,’ असा विश्वास रश्मी शुक्ला यांनी निवेदनात व्यक्त केला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply