Ranjit Kasale : मोठी बातमी! निलंबित PSI रणजित कासलेंना बीड पोलिसांनी घेतलं ताब्यात


Ranjit Kasale : वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची आपल्याला ऑफर देण्यात आली होती, असा दावा करून खळबळ उडवून देणाऱ्या बीडचे निलंबित पोलिस उपनिरीक्षक रणजित कासलेंना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतलं. बीड पोलिसांनी रणजित कासले यांना पुण्यातील एका हॉटेलमधून ताब्यात घेतलं. रणजित कासले गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत होते. पोलिस त्यांचा शोध घेत होते. दोन दिवसांपूर्वी रणजित कासले यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत लवकरच मी शरण येणार असल्याचे सांगितले होते. अखेर त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

मिळालेल्या माहितीनुसार, निलंबित पीएसआय रणजित कासले यांना बीड पोलिसांनी ताब्यात घेतलं. पुण्यातील स्वारगेट परिसरात असणाऱ्या हॉटेलमधून आज पहाटे बीड पोलिसांनी कासलेंना ताब्यात घेतलं. काल ते दिल्लीवरून पुण्यात आले. पुणे एअरपोर्टबाहेर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यानंतर ते पुण्यातील एका हॉटेलवर मुक्काम करायला गेले. पत्रकारांशी संवाद साधताना रणजित कासले यांनी पुन्हा गंभीर आरोप केले होते.

पुणे पोलिसांकडे सरेंडर होऊन बीड पोलिसांकडे अटक होणार असं रणजित कासले यांनी सांगितलं होतं. पण ते पुणे पोलिसांकडे शरण आले नाही. शेवटी आज पहाटे रणजित कासले मुक्कामी असलेल्या हॉटेलमधून बीड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. आता पोलिस रणजित कासले यांना चौकशीसाठी बीडला घेऊन जाणार आहेत.

दरम्यान, निलंबित पीएसआय रणजित कासले गेल्या काही दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडे, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांचे नाव घेत अनेक गंभीर आरोप करत होते. मला वाल्मिक कराडचे एन्काऊंटर करण्यासाठी ऑफर देण्यात आली होती, असा मोठा दावा त्यांनी केला होता. तसंच, 'मी जे पुरावे मी सादर करतोय मला त्याबाबत विचारावे. ज्या दिवशी मतदान होतं. त्या दिवशी माझ्या बँक खात्यात दहा लाख रुपये आले.', असा मोठा दावा देखील रणजित कासले यांनी केला होता.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply