Ramtek lok sabha : शिंदेंच्या गटाची अडचण होणार? रामटेक लोकसभेवर भाजप नेत्यांचा डोळा

Ramtek lok sabha : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरुन सत्ताधारी महायुतीमध्येही नाराजीनाट्य असल्याचं ऐकायला मिळतेय. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीमागे लोकसभा जागावाटप हेच कारण असल्याचं सांगण्यात येत आहे. पण जागावाटप ठरण्याआधीच आता भाजपच्या अनेक नेत्यांनी शिवसेनेच्या विद्यमान खासदारांच्या मतदारसंघावर दावा ठोकला आहे. त्यापैकीच एक मतदारसंघ हा रामटेक लोकसभा मतदारसंघ आहे.

रामटेक लोकसभा मतदारसंघातून निवडून येणारा खासदार हा कमळ चिन्हावर लढणारा असेल,असं स्थानिक भाजप नेत्यांनी म्हटलं आहे. त्यानंतर महायुतीमध्ये स्थानिक पातळीवरही संघर्ष असल्याचं दिसत आहे. 

Pune Metro : पुणे मेट्रो प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! रिटर्न तिकीट सेवा 1 मार्चपासून होणार बंद

रामटेक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. रामटेक मतदारसंघ परंपरेने शिवसेनेचा मतदारसंघ आहे. महायुतीमध्ये गेल्या अनेक लोकसभा निवडणुका या मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार राहिलेला आहे. सध्याही एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले कृपाल तुमाने रामटेकमधून शिवसेनेचे खासदार आहेत. मात्र, आता भाजपने या मतदारसंघावर जोरदार दावा केला आहे.

भाजप कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की, या मतदारसंघात सर्वत्र आमचे संघटन मजबूत आहे. त्यामुळे रामटेक मतदारसंघात भाजपचा खासदार असावा, अशी कार्यकर्त्यांची जोरदार मागणी आहे. आम्ही ती पक्षश्रेष्ठींना कळविली आहे. यंदा रामटेक मधून भाजपचाच खासदार निवडून येईल. असा दावा भाजप नेते करत आहेत. यंदा रामटेकमधून निवडून येणारा खासदार कमळ चिन्हावर निवडून येणारा असेल, असा दावाही स्थानिक भाजप नेत्यांनी केला आहे.

रामटेकमधील उमेदवरार हा भाजपचाच असेल की दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये आलेला असेल, यावर मात्र भाजप नेते स्पष्ट बोलत नाहीये. त्यामुळे रामटेक मतदारसंघाच्या मुद्द्यावरून एका बाजूला भाजप आणि शिंदे गटामध्ये जोरदार रस्सीखेच होत असल्याचे दिसून येत आहे. तर दुसऱ्या बाजूला रामटेकमधून भाजपचा खासदार निवडून आणण्याचा हट्ट धरणारा भाजप ऐन वेळेला इतर पक्षातील उमेदवार आयात करतील. त्यानंतर त्याला उमेदवारी देण्याची शक्यताही नाकारता येत नाही. भाजपकडून उमेदवार कोण असेल हे अद्याप निश्चित नाही, मात्र जागा वाटपात ही जागा शिवसेनेकडून घेऊन भाजप आपल्या ताब्यात घेण्याची दाट शक्यता आहे.

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले, 'या लोकसभेबाबत अजून काही चर्चा झालेली नाहीये. ज्यावेळेस चर्चा होईल त्याचा स्पष्टीकरण देण्यात येईल. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री याबद्दल चर्चा करतील. त्यामुळे कोणत्याही चर्चेला अर्थ नाही'.

विरोधी पक्षनेते विजय वटेट्टीवार म्हणाले,'रामटेक परभणी यासह इतर जागा आहे. या सगळ्या जागेचा घोळ सुरू आहे. शिंदे गटाला आठ नऊ जागेच्या पलीकडे भाजपला देण्याची मानसिकता नाही. राष्ट्रवादीला चार ते पाच जागा आणि शिंदे गटाला आठ ते नऊ जागा देतील अशी आतली माहिती आमच्याकडे आहे'.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply