Ramesh Pardeshi : नशेतल्या तरुणींचा व्हिडिओ बनवणं पडलं महागात; 'पिट्या भाई'विरुद्ध महिला आयोगाकडे तक्रार

Ramesh Pardeshi : रमेश परदेशीने काही दिवसांपूर्वी वेताळ टेकडीवर नशेतल्या तरुणींचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. नशेत गुंग असणाऱ्या या तरुणींना कशाचंही भान नव्हतं. या नशेतील तरुणींचा व्हिडिओ मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई'ने सोशल मीडियावर रविवारी शेअर केला होता. याच पिट्या भाईला नशेतील तरुणींचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करणं महागात पडू शकतं. अभिनेता रमेश परदेशीविरुद्ध महिला आयोगात तक्रार नोंद करण्यात आली आहे. 

दरम्यान, रमेश परदेशीने नशेत गुंग असणाऱ्या तरुणींचे चेहरे ब्लर न करता व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. यानंतर रमेश परदेशीच्या व्हिडिओवर काही सकारात्मक आणि काही नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या होत्या. या तरुणींचे चेहरे ब्लर न करताना व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याने त्याच्यावर अनेकांनी टीका केली होती.

Pune News : पुण्यात ‘एम्स’ उभे राहणार! अजित पवारांची मोठी घोषणा

तर यावरूनच मुंबईतील पत्रकार नेहा पुरव यांनी अभिनेता रमेश परदेशी विरोधात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. या प्रकरणी योग्य चौकशी करून कार्यवाही करावी. तसेच महिला आयोगाने अहवाल पाठवावा, असे पत्र कोथरुड पोलिसांनी पाठवले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply