Raksha Bandhan 2023: रक्षाबंधनाच्या दिवशीच मोठी दुर्घटना; यमुना नदीत बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू

Uttar Pradesh : देशभरात रक्षाबंधनाचा सण अत्यंत उत्साहात साजरा केला जात आहे. अनेक बहिणी लाडक्या भावांना राखी बांधून त्यांच्याकडून आपल्या संरक्षणाचे वचन घेत आहेत. अशातच उत्तरप्रदेशातील बांदा जिल्ह्यात एक भयानक घटना घडली आहे. बांदा येथे यमुना नदीत कजारियाचे विसर्जन करण्यासाठी गेलेली ७ मुले पाण्यात बुडाली. यातील ४ मुलांचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. 

तर ३ जणांचा वाचवण्यात गावकऱ्यांना यश आले असून अद्यापही एका मुलाचा शोध घेणे सुरू आहे. मृतांमध्ये दोन अल्पवयीन मुली आणि दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. रक्षाबंधनाच्या दिवशीच चार मुलांचा बुडून मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील पैलानीच्या गुडगाव परिसरात ही घटना घडली. रक्षाबंधनाचा सण असल्याने गावातील काही शाळकरी मुले यमुना नदीच्या काठी कजरिया विसर्जनासाठी गेली होती. यावेळी काही मुले पाण्यात उतरली.

Pune Fraud : ऑनलाईन ऑर्डरमध्ये बंद मोबाईल अन् साबण... फ्लिपकार्टचे कर्मचारीच घालत होते ग्राहकांना गंडा; चौघांना अटक

दरम्यान, पाण्याचा अंदाज न आल्याने मुले अचानक बुडू लागली. ही बाब लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांनी तातडीने पाण्यात उड्या घेत मुलांचा शोध घेतला. यातील तीन मुलांना वाचवण्यात यश आलं. मात्र, ४ मुलांचा बुडून मृत्यू झाला.

बुडालेल्या ४ मुलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. अजूनही एक मुलगा बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे. राखी पौर्णिमेच्या दिवशीच गावातील ४ शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अधिकचा तपास केला जात आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply