बॉलिवूड अभिनेते राजपाल यादव सध्या आयुष्यातील सर्वात कठीण काळातून जात आहेत. जुने ९ कोटींचे कर्ज प्रकरण आणि त्यावरील व्याजामुळे त्यांना दिल्लीच्या तिहार जेलमध्ये राहावे लागत आहे. “माझ्याकडे आता एक रुपयाही उरलेला नाही,” असे हताश होऊन ते बोलले होते. या कठीण प्रसंगी त्याच्या मदतीला आधी सलमान खान धावला नंतर अजय देवगण आणि सोनू सूद यांनी मदत केली आहे. आता शिक्षा भोगत असतानाच राजपाल यादव लखपती झाल्याचे समोर आले आहे. त्याला मोठी ऑफर आली आहे.
आता मात्र मनोरंजन क्षेत्रातील एक मोठे नाव राजपाल यादवच्या पाठीशी ठाम उभे राहिले आहे. टीव्हीएफ (The Viral Fever) जी ‘पंचायत’, ‘गुल्लक’, ‘ये मेरी फॅमिली’, ‘कॉमेडी ऑन डिलिव्हरी’ सारख्या लोकप्रिय वेब सीरिजेससाठी ओळखली जाते त्यांनी राजपाल यादवला पाठिंबा दिला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत राजपाल यादवला पाठिंबा दिला आहे.
काय आहे पोस्ट?
टीव्हीएफने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक हृदयस्पर्शी पोस्ट लिहिली आहे. “या कठीण काळात आम्ही राजपाल यादव सर यांच्यासोबत उभे आहोत. राजपालजी, तुमच्या अभिनयाने गेल्या अनेक दशकांपासून करोडो लोकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आहे. आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि आम्हाला तुमच्यासोबत एक खास, अर्थपूर्ण वेब सीरिज बनवायला नक्कीच आवडेल. अशी एक सीरिज जिथे प्रेक्षक तुमची ती जादुई कॉमेडी पुन्हा एकदा जवळून अनुभवू शकतील” या आशयाची पोस्ट त्यांनी केली आहे.
कर्ज कसे वाढले?
2012 साली राजपाल यादवने स्वतः दिग्दर्शित केलेला चित्रपट ‘अता पता लापता’ साठी 5 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. दुर्दैवाने हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यानंतर व्याज आणि इतर कारणांमुळे ही रक्कम 9 कोटींपर्यंत पोहोचली. कर्ज फेडण्याची तजवीज न झाल्याने कोर्टाने त्यांना सरेंडर करण्याचा आदेश दिला आणि सध्या ते तिहार जेलमध्ये शिक्षा भोगत आहेत.
जेलमधून बाहेर पडताच कामाचा ओघ
टीव्हीएफसारख्या मोठ्या आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्मकडून मिळालेली ही ऑफर राजपाल यादव यांच्यासाठी खूप मोठी आशा आहे. जेलमधून सुटका झाल्यानंतर त्यांच्यासमोर कामाची संधी असेल आणि या प्रोजेक्टमधून मिळणाऱ्या कमाईतून ते आपले कर्ज हळूहळू फेडू शकतील, असा चाहत्यांना विश्वास आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


