Rajgad Fort Landslide : राजगड किल्ल्यावर दरड कोसळली! पर्यटक नसल्याने अनर्थ टळला; काळजी घेण्याचे पुरातत्व विभागाकडून आवाहन

Maharashtra Rain Updates: राजधानी मुंबईसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. पुणे जिल्ह्याीतल किल्ले राजगडावर बालेकिल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली आहे. त्यामुळेच पर्यटकांना फिरायला येताना काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, राजगड किल्ल्यावर बालेकिल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे दगड निसटले असून दरड कोसळल्याची घटना आज शनिवार (ता.२२) रोजी सुमारास पहाटेच्या सुमारास घडली. सुदैवाने या मार्गावर पर्यटक नसल्याने कोणतीही दुर्घटना घडली नसली तरीही किल्ल्याच्या धोकादायक ठिकाणी पर्यटकांनी काळजी घेण्याचे आवाहन पुरातत्व विभागाकडून करण्यात आले आहे.

Tansa Dam : ठाण्यातील तानसा धरण ओसंडून वाहण्याची शक्यता, परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा

ही माहिती मिळताच पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या धोकादायक ठिकाणावरून जाण्यासाठी पर्यटकांना रोखले आहे. राज सदरेकडून बालेकिल्लाकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन-तीन मोठे दगड निसटले असून त्या दगडांबरोबर झाडे झुडपे व मातीचा ढीग खाली आले आल्याचे पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने यांनी सांगितले आहे. 

दरम्यान, वेल्हे तालुक्यातील पर्यटन स्थळांवर सुट्टीच्या दिवशी व पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. किल्ले राजगड व तोरणा गडावर शनिवारी, रविवारी चार ते पाच हजाराच्या पुढे पर्यटक येत असतात. परंतु सध्या गडकोटांवर पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून यामध्ये मोठी दुर्घटना घडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply