Rajendra Patni Passed Away : भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन; वयाच्या ५९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Rajendra Patni Passed Away : राजकीय वर्तुळातून एक दुर्देवी बातमी समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाचे आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ५९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला गेल्या काही दिवसांपासून राजेंद्र पाटणी आजारी होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे ट्वीट..

'अत्यंत दुःखद बातमी: विधानसभेतील माझे सहकारी राजेंद्र पाटणीजी यांचे आज निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून ते आजाराशी झुंज देत होते. ते या संकटातून बाहेर पडतील, अशी आम्हा सर्वांना आशा होती. पण आज त्यांची प्राणज्योत मालवली,"

Manohar Joshi Passed Away : राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन; मुंबईत घेतला अखेरचा श्वास

"ग्रामीण प्रश्नांची जाण असलेला लोकप्रतिनिधी भाजपाने गमावला आहे. पश्चिम विदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचा कायम पुढाकार असायचा. सिंचनाचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे, म्हणून ते सतत आग्रही असायचे. त्यांचे निधन ही माझी वैयक्तिक हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची शक्ती कुटुंबीयांना मिळावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो," असे देवेंद्र फडणवीस म्हणालेत.

दरम्यान, राजेंद्र पाटणी हे वाशिमच्या कारंजा मतदारसंघातील आमदार होते. ते आधी शिवसेना पक्षात होते. त्यानंतर ते भाजपमध्ये  प्रवेश करत आमदार म्हणून निवडून आले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. याच आजाराने त्यांचे निधन झाले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply