Rajasthan News : १३ तासांचे रेस्क्यू ऑपरेशन, खाणीत अडकलेल्या १४ अधिकाऱ्यांची सुटका; एकाचा मृत्यू

Rajasthan News : राजस्थानमधील  झुंझुनू येथे कोलिहान खाण दुर्घटनेत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या खाणीमध्ये लिफ्ट कोसळून अडकलेल्या १५ पैकी १४ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आले आहे. तर जखमी झालेल्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. १३ तासांपेक्षा जास्त वेळ या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू होते. अखेर लिफ्टमध्ये अडकलेल्या १४ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. मात्र उपेंद्र पांडे या अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. आता खाणीत अडकलेल्या १५० मजुरांना बाहेर काढण्यात येणार आहे.
 
मंगळवारी कोलकात्याचे दक्षता पथक हिंदुस्थान कॉपर लिमिटेडच्या कोलिहान खाणीत आले होते. खेत्री कॉपर कॉर्पोरेशनचे वरिष्ठ अधिकारीही यावेळी उपस्थित होते. खाणीतील कामाची पाहणी केल्यानंतर मंगळवारी रात्री हे सर्वजण लिफ्टमधून वर येत होते. त्यावेळी अचानक लिफ्टची साखळी तुटली आणि लिफ्ट १८०० फूट खाली कोसळली. या लिफ्टमध्ये १५ अधिकारी अडकले होते. ते सर्वजण लिफ्टसोबत खाली पडले. यामधील अनेक जण जखमी झाले होते.
 
राजस्थान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाहेर काढण्यात आलेल्या अधिकाऱ्यांपैकी ४ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जयपूरला हलवण्यात आले आहे. त्याचवेळी बाहेर काढण्यात आलेल्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. आपत्कालीन परिस्थितीसाठी डॉक्टरांचे पथक आधीच तयार होते. सर्व जखमींना लिफ्टमधून बाहेर काढताच त्यांना तातडीने वैद्यकीय सेवा देण्यात आली. लिफ्ट कोसळलेल्या खाणीत १५० पेक्षा अधिक मजूर काम करत होते. लिफ्ट कोसळल्यामुळे ते खाणीमध्ये अडकले होते. आता या मजुरांनाही आता बाहेर काढण्यात येणार आहे.


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply