Rajapur Crime : मुंबई-गोवा महामार्गावरच्या खड्ड्यांवरून मनसे आक्रमक ; राजापूर येथील टोलनाका मनसे कार्यकर्त्याने फोडला

राजापूर : मुंबई-गोवा महामार्गावरच्या खड्ड्यांवरून मनसे चांगलीच आक्रमक झाली आहे. राजापूर येथील टोलनाका मनसे कार्यकर्त्याने फोडला आहे. मनसेचा एक कार्यकर्ता पक्षाचा झेंडा घेऊन टोलनाक्यावर आला आणि त्याने काठीने टोलनाक्यावरच्या काचा फोडल्या. राज ठाकरे यांनी बुधवारी पनवेलमध्ये निर्धार मेळावा घेतला, या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी मुंबई-गोवा महामार्गावरच्या खड्ड्यांवरून आंदोलनाचा इशारा दिला. याआधी काल मनसे कार्यकर्त्यांनी मुंबई-गोवा महामार्गाचं काम करणाऱ्या कंपनीच्या कार्यालयाची तोडफोड केली. माणगावमधील बांधकाम कंपनीचं कार्यालय मनसैनिकांनी फोडलं होतं.

मुंबई-गोवा महामार्गावरच्या खड्ड्यांवरून राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. ‘अख्खा महाराष्ट्रात कोकणाचीच नाही तर अनेक रस्त्यांची तिच हालत आहे. हे खड्डे आज पडलेले नाहीत. 2007 मध्ये मुंबई गोवा रस्त्याचं काम चालू झालं. काँग्रेस, शिवसेना भाजप सरकार आलं. ना आकार ना उकार कोणाकोणाचं सरकार आलं, मात्र काय झालं. निवडणुकीच्या तोंडावर वारेमाप गोष्टी सांगतात आश्वासन देतात. निवडणून आल्यावर करु बघू म्हणतात’, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केली. मुंबई गोवा महामार्गावरील पळस्पे ते इंदापूर या पल्यावरील डांबरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या महामार्गाची पाहणी राज ठाकरेंनी केली. 2007 पासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गावरून मनसे आक्रमक झाला आहे.

Ratnagiri : मुंबई गोवा महामार्गाच्या आंदोलनानंतर मनसे आक्रमक, रत्नागिरीच्या पाली खानूमधलं कंपनीच कार्यालय मनसेनं फोडलं

पनवेल येथे झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी या रखडलेल्या महामार्गावरून आक्रमक भूमिका घेतली. आत्तापर्यंत मुंबई गोवा महामार्गावर खर्च झालेला पैसा 15,666 कोटी रुपये आहे. तरीही रस्ता झाला नाही. फक्त काहींच्या तुंबड्या भरल्या गेल्याचं राज ठाकरेंनी म्हटलंय. त्याच-त्याच लोकांना पुन्हा-पुन्हा मतदान केल्यामुळे असंच होणार, असंही राज ठाकरे म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply