Raj Thackeray vs Uddhav Thackeray : हिंदुत्वावरून ठाकरेंमध्ये दिवार, महायुतीसाठी जमीन सुपीक होणार?

Maharashtra Assembly elections 2024: विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोमात आलेला असताना राज ठाकरेंनी आपल्या प्रचाराची तोफ उद्धव ठाकरेंकडे वळवलीय. हिंदुत्वावरून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलंय. मशिदीवरील भोंगे, मशिदीतले फतवे आणि मनसैनिकांवरील गुन्ह्यांचा मुद्दा राज यांनी पुढे आणलाय. त्यामुळे हिंदुत्वावरून ठाकरे बंधुंमध्ये सामना रंगणार असल्याचं दिसतंय.

अमरावतीच्या जाहीर सभेत राज ठाकरेंनी मशिदीच्या भोंग्यावरील मुद्द्याला हात घालून पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मतं मागितली आहेत..ऐन विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा हाती घेतला आहे. मात्र यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि तत्त्कालीन मविआ सरकारवर निशाणा साधलाय. राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करत अमरावतीच्या सभेत उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलंय.. त्यामुळे आता ऐन विधानसभेच्या तोंडावर पुन्हा एकदा मशि‍दीवरील भोंग्यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. एवढंच नव्हे तर उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या नावातली हिंदुहृदयसम्राट ही उपाधी काढली असाही हल्लाबोल राज ठाकरेंनी केलाय.

Maharashtra Election : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठं खिंडार, ९१ पदाधिकाऱ्यांनी सोडली साध, भाजपचा प्रचार करणार!

राज ठाकरेंनी पुन्हा भावनिक आवाहन करत मतदारांना हाती सत्ता देण्याची साद घातलीये. मनसे स्वबळावर लढत असली तरी हिंदुत्वाच्या मुद्यावर महायुतीसाठी जमीन सुपीक करण्याचं काम राज ठाकरे आपल्या भाषणातून करताना पाहायला मिळतायत. त्यात विशेषतः राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना शिंगावर घेतलंय...प्रत्येक सभेत राज ठाकरे उद्धव यांच्यावर टीका करताना पाहायला मिळतायं. त्यामुळे पुढच्या काळात प्रचारात ठाकरे विरूद्द ठाकरे सामना रंगण्याची शक्यता आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply