Raj Thackeray Sabha: राज ठाकरेंच्या सभेसाठी मुंबईहून निघालेल्या मनसैनिकांच्या कारला संगमेश्वरजवळ अपघात; मनसे उपशाखाध्यक्षाचा मृत्यू

मनसे अध्यक्ष राज ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. आज त्याठिकाणी राज ठाकरेंची मोठी सभा होणार आहे. रत्नागिरीत या सभेची जय्यत तयारी सुरू आहे. राज ठाकरे हे कालच या सभेसाठी रत्नागिरीला पोहचले आहेत. राज ठाकरे यांची तोफ आज धडाडणार आहे. या सभेसाठी राज्यभरतील मनसेचे कार्यकर्ते रत्नागिरीत दाखल झाले आहेत.

काही कार्यकर्ते सभेच्या आधी दाखल होणार आहेत. मात्र, या सभेदरम्यान एक दुर्देवी घटना घडली आहे. रत्नागिरीकडे जात असतानाच मनसे कार्यकर्त्यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तर 3 जण जखमी झाले आहेत. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

राज ठाकरेंच्या सभेसाठी निघालेल्या मनसैनिकांच्या गाडीला रत्नागिरीजवळ अपघात झाला आहे. या अपघातात मनसेचे दहिसर विभागाचे उपशाखाप्रमुख देवा साळवी यांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात इतर मनसे सैनिक किरकोळ जखमी झालेत. अपघातात जखमी झालेल्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जखमींवर उपचार करण्यात येत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.

आज झालेल्या अपघातात मनसे सैनिकाचा मृत्यू झाल्यामुळे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. या अपघाताची माहिती देताना संदीप देशपांडे म्हणाले की, सकाळी ही दुःखद घटना घडली आहे. या अपघातात एका मनसैनिकाचा मृत्यू झाला आहे. बाकी मनसे सैनिक किरकोळ जखमी आहेत.

दरम्यान आज रत्नागिरीमध्ये राज ठाकरे यांची सभा आहे. या सभेत राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. या सभेतून राज ठाकरे कोणावर निशाणा साधणार, सध्याच्या राजकीय परिस्थितीवर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply