Raj Thackeray : 'जिल्हा प्रशासनाला अंदाज का आला नाही?', इर्शाळवाडी दुर्घटनेवर राज ठाकरेंचा संतप्त सवाल

Irshalwadi Landslide : रायगड जिल्ह्यातल्या खालापूरजवळच्या इर्शालगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीवर दरड कोसळल्याची घटना घडली. या घटनेमध्ये आतापर्यंत १० जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर 89 जण सुरक्षित आहेत. १०० पेक्षा अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.

या घटनेनंतर अनेक राजकीय नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी सरकारला तर काहींनी जिल्हा प्रशासनाला धारेवर धरले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इर्शाळवाडीच्या दुर्घटनेवर दु:ख व्यक्त करत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 'जिल्हा प्रशासनाला अंदाज का आला नाही?', असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे.

राज ठाकरे यांनी इर्शाळवाडीच्या दुर्घटनाप्रकरणी फेसबुक पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे. त्यांनी या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, 'रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी येथे गावावर दरड कोसळल्याची घटना अतिशय दुःखद आहे. युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे असं सांगण्यात येत आहे. ह्यातून लोकं सुखरूप बाहेर पडावीत इतकी इच्छा.

Sharad Pawar : शरद पवारांना मोठा धक्का, नागालँडमधील सात आमदारांनी अजित पवारांना जाहीर केला पाठिंबा

'या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना इर्शाळवाडी दुर्घटनेतील लोकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, 'जे जखमी आहेत त्यांच्यावर योग्य उपचार सुरु आहेत ना आणि त्यांच्या नातेवाईकांना आपल्याकडून काय मदत मिळेल हे माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी जरूर पाहावं.' तसचं, 'खरंतर अशा घटना घडल्यावर लगेच हे बोलायची इच्छा नव्हती. पण आत्ता इतकंच सांगतो की कुठे दरड कोसळू शकतात ह्याचा अंदाज जर त्या जिल्हा प्रशासनाला येत नसेल तर मग ते कसलं प्रशासन?,' असा सवाल त्यांनी केला आहे.

'पुढे ह्यावर सविस्तर बोलेन पण आत्तातरी सगळे सुखरूप राहावेत हीच इच्छा', असे सांगत राज ठाकरे यांनी इर्शाळवाडी दुर्घटनेविषयी नंतर सविस्तर बोलेल असे सांगितले आहे. दरम्यान, इर्शाळवाडी दुर्घटनेच्या ठिकाणावर जिल्हा प्रशासन, अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या पथकाकडून बचावकार्य युद्ध पातळीवर सुरु आहे. पण मुसळधार पाऊस, अरुंद रस्ते, दुर्गंम भाग असल्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि काही मंत्री घटनास्थळावर उपस्थित असून ते मृतांचे नातेवाईक आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्या गावकऱ्यांच्या नातेवाईकांना धीर देत आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply