Raj Thackeray News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा दिलासा, प्रतिबंधात्मक आदेश मोडल्याचा गुन्हा रद्द, हायकोर्टाचे आदेश

Raj Thackeray News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. कल्याण पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा हायकोर्टाने रद्द केला आहे. २०१० साली राज ठाकरे यांच्यावर कल्याण पोलिसांनी तडीपारीची नोटीस बजावली होती. ही नोटीस न स्वीकारल्याबद्दल पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. 

याच प्रकरणी साल २०११ मध्ये राज ठाकरे यांनी कल्याण कोर्टात हजेरी लावत जामीन मिळवला होता. याविरोधात राज ठाकरे यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. राज ठाकरे यांच्या वतीने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.

Mumbai Accident News : मुंबईत वांद्रे वरळी सी लिंकवर तीन वाहनांचा विचित्र अपघात, तिघांचा मृत्यू, 6 जण जखमी

१५ ऑक्टोबरला न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर अंतिम सुनावणी झाली होती. त्यावेळी कोर्टाने निर्णय राखून ठेवला होता. दरम्यान मुंबई हायकोर्ट याबाबत काय निर्णय देणार? याकडे संपूर्ण मनसैनिकांचे लक्ष लागून होते.

राज ठाकरेंना मिळणार का दिलासा? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात होता. आज हायकोर्टाने यावर निकाल देताना कल्याण पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द केला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, राज ठाकरे यांना दिलासा मिळताच मनसैनिकांनी आनंद साजरा केला आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply