Raj Thackeray Kokan Sabha : 'काेकणपट्यात माेठा उत्साह, साहेबांची सभा सर्व रेकाॅर्ड ब्रेक करेल'; राज ठाकरेंची उद्या रत्नागिरीत तोफ धडधडणार

Raj Thackeray News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या रत्नागिरीतील उद्याच्या (शनिवार) सभेच्या तयारीची अंतिम टप्प्यात आली आहे. शहरात राज ठाकरेंची हाेणारी सभा पहिलीच सभा असल्याने संपुर्ण काेकणातील जनता या सभेस येईल असा अंदाज बांधला जात आहे. मनसे नेेते नितीन सरदेसाई यांनी यापुर्वीच्या सभांचे रेकाॅर्ड ब्रेक हाेईल असा दावा साम टीव्हीशी बाेलताना केला आहे.

रत्नागिरी शहरातील प्रमोद महाजन क्रिडा संकुल मैदानावर राज ठाकरेंच्या सभेसाठीची मनसैनिक जय्यत तयारी करीत आहेत. रत्नागिरी शहरातील मनसैनिकांना या सभेला माेठी गर्दी हाेईल असा विश्वास आहे.

काेकणातील राजकारणाला येथील जनता कंटाळली आहे असे मनसैनिकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच राज साहेबांच्या सभेला काेकणी जनता माेठ्या संख्येने उपस्थित राहील असे मनसैनिकांनी नमूद केले.

मनसेचे नेते नितीन सरदेसाई म्हणाले राज ठाकरे यांची काेकणातील रत्नागिरीतील पहिली सभा आहे. मी दाेन दिवासांपासून येथे आहे. अनेकांशी मी संवाद साधला. लाेक उत्साही आहेत. ही सभा रेकाॅर्ड ब्रेक सभा हाेईल असा विश्वा सरदेसाई यांनी व्यक्त केला. मनसेने सभेची सर्व तयारी पूर्ण केल्याचे सरदेसाईंनी नमूद केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply