Raj Thackeray : राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र; ठिकठिकाणी 'मनसे कट्टा' बांधण्याचे आदेश

Kalyan News : मनसे प्रमुख राज ठाकरे हे कल्याण डोंबिवलीच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर होते. रविवारी ठाकरे यांनी कल्याणमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधून काही सूचना केल्या.

त्यानंतर राज ठाकरे आज डोंबिवलीत दाखल झाले. डोंबिवलीतील सर्वेश हॉलमध्ये मनसे आमदार राजू पाटील यांच्या उपस्थितीत राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर काही जणांनी मनसेत प्रवेश केला. 

राज ठाकरे यांनी बैठकीदरम्यान काही महत्वाच्या सूचना केल्या आहेत. राज ठाकरे यांनी डोंबिवलीत झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीदरम्यान संघटनात्मक बांधनीसाठी पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला. 

राज ठाकरे यांनी लोकांशी संपर्क वाढवा, ठिकठिकाणी 'मनसे कट्टा' बांधा, लोक शाखेत येऊन व्यक्त होत नाहीत, कट्ट्यावर व्यक्त होतात. लोकांचं पक्षाबद्दल आणि तुमच्या कामाबद्दल काय मत आहे, जाणून घ्या. या पार्श्वभूमीवर येत्या जून महिन्यात मनसे कट्ट्याबाबत डोंबिवलीत मनसे नेत्यांची मोठी कार्यशाळा घेण्यात येणार आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *