Raj Thackeray : मनसे महायुतीत सहभागी होणार की नाही? राज ठाकरेंनी थेट सांगूनच टाकलं

Raj Thackeray : राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकारणावरून भाष्य केलंय. महाराष्ट्रात राजकीय चिखलफेक सुरू असल्याचे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केलं. विधानभवनात एका कार्यक्रमाला गेलो होतो, कोण-कोणत्या पक्षात आहे, हेच कळत नसल्याचं राज ठाकरे म्हणालेत. त्याचबरोबर त्यांनी महायुतीत जाण्याच्या चर्चांवरही भाष्य केलंय.

देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत. प्रत्येक पक्ष निवडणुकीच्या तयारीसाठी मोर्चेबांधणी करू लागलाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना   देखील यावेळी लोकसभा निवडणुकीत उतरणार आहे. लोकसभेासाठी मनसे राज्यातील महायुतीसोबत जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र या फक्त चर्चा आहेत, त्याला कोणतंच तथ्यचं नसल्याचं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. व्यासपीठावर दिसण्याने आघाडी घडत किंवा ठरत नसतात,असं म्हणत महायुतीत समावेश होण्याच्या चर्चांना राज ठाकरेंनी पडदा टाकलाय.

Maratha Reservation : राज्यभरात मराठा समाजाचा रास्ता रोको; जालन्यात समृद्धी महामार्ग अडवला, वाहतुकीला मोठा फटका

आगामी निवडणुकीच्या मनसेकडून चाचपणी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे हे दोन दिवसांपासून कल्याण डोंबिवलीच्या दौऱ्यावर आहेत काल कल्याण मधील कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर आज राज ठाकरे  यांनी डोंबिवली येथे कल्याण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतत त्यांनी राजकीय परिस्थितीवर सडेतोड टीका केली. मराठा आरक्षण, निवडणूक आयोग, राष्ट्रवाद आमदार अपात्रता सुनावणीवरही भाष्य केलं.

यावेळी राज ठाकरेंनी शरद पवार यांच्यावर टीका केलीय. शरद पवार यांच्या पक्षाचे तुतारी या चिन्हाचे अनावरणात रायगडावर करण्यात आले यावरून राज ठाकरे यांनी शरद पवारांना लक्ष्य केलं. महाराष्ट्रातले महापुरुष जाती मध्ये विभागून टाकलेत , आजपर्यंत कधीच छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव न घेणारे शरद पवार यांना आज रायगड आठवला असल्याचा टोला राज ठाकरे यांनी लगावला.

 

महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष

सध्या महाराष्ट्रात अनेक प्रश्न असून दुष्काळी स्थिती आहे. पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय. या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठी जातीच राजकारण पुढं केलं जात असल्याचं राज ठाकरे म्हणालेत. गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याच्या प्रकरणावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. गायकवाड यांच्यावर गोळीबार करण्याची वेळ का आली? एवढं टोकाचं पाऊल त्यांनी का घेतलं? याचीही सखोल चौकशी झाली पाहिजे असेही ते म्हणाले.

मराठी भाषेला अभिषेक दर्जा मिळण्याबाबतचे मागणे अद्याप पूर्ण झालेली नाही. याबाबत बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यकर्त्यांना याबाबत काही देणं घेणं नाही. तर राज्यात राज्यातले पक्ष सत्तेवर आले पाहिजेत,तेच अशा प्रकारचा दबाव टाकू शकतात असेही राज ठाकरे म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply