Raj Thackeray : रेल्वे भरतीची जाहिरात निघताच राज ठाकरेंची पोस्ट; मराठा तरुण-तरुणींना केलं महत्वाचं आवाहन

Raj Thackeray : मराठा तरुण-तरुणींनी सरकारी नोकऱ्यांमध्ये पुढाकार घ्यावा, तसेच कठोर मेहनत करून यश संपादित करावं, असं आवाहन वारंवार मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या भाषणातून करतात. अनेकदा ते मराठी अस्मिता आणि बेरोजगारीचा प्रश्न देखील उपस्थित करतात. आता पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत मराठा तरुण-तरुणींना महत्वाचं आवाहन केलं आहे.

भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयात सहाय्यक लोको पायलटपदाच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. ही जाहिरात आपल्या अधिकृत X अकाउंटवरून (पूर्वीचे ट्वीटर) पोस्ट करत राज ठाकरे यांनी मराठा-तरुण तरुणींना सतर्क केलं आहे.

Accident News : मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात, पाच जखमी; चुकीच्या वळण मार्गामुळे दासगावमधील स्थानिक आक्रमक

"भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाची एक जाहिरात आली आहे. सहाय्यक लोको पायलटच्या ५६९६ जागा आहेत. १८ ते ३० वयाची मर्यादा आहे. अधिक तपशील ह्या जाहिरातीत दिलेल्या वेबसाईटवर मिळेल. तो जरूर पहावा", असं राज ठाकरे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय. 

"या नोकरभरतीत जास्तीत जास्त मराठी तरूण-तरूणींना रोजगार मिळेल हे पहावं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा रोजगार आणि स्वयं-रोजगार विभाग ह्यासाठी तत्पर आहेच", असंही राज यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी मनसे कार्यकर्त्यांना महत्वाचं आवाहन देखील केलं आ

"महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी नुसतंच “बघा वेबसाईट” असं म्हणून चालणार नाही. शाखा-शाखांवर, संपर्क कार्यालयांत, गडांवर ह्याचा रितसर तपशील लावावा. ह्याविषयातल्या तज्ञ मंडळींना ही जाहिरात दाखवून व्यवस्थित सूचना तयार कराव्यात".

"त्या आपल्या कार्यालयांत लावाव्यात. वाटल्यास हा अर्ज कसा भरायचा, मुलाखत कशी द्यायची ह्याचंही पूर्ण मार्गदर्शन करावं. जास्तीत-जास्त मराठी तरूण ह्यात नोकरी कशी मिळवेल ह्याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष दिलं गेलं पाहिजे", असे आदेशच राज यांनी कार्यकर्त्यांना दिले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply