Raj Thackeray : गुरुवारपासून राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर; म्हणाले, "तयारीला लागा मी येतोय"

Raj Thackeray : गेल्या महिन्याभरापासून नाशिकचे राजकीय महत्व वाढल्याचे दिसून येत आहे. 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी  नाशिक दौऱ्यावर होते. 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्याला न जाता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिकला हजेरी लावली तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी नाशिकला हजेरी लावली. त्यानंतर आता मनसे प्रमुख राज ठाकरे देखील नाशिक दौऱ्यावर येणार आहेत.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून राज ठाकरे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नाशिकमध्ये चार दिवसांचा तळ ठोकणार आहे. लोकसभेत मतांची विभागणी करण्यासाठी राज ठाकरे रणनीती आखणार आहेत. 2008 साली नाशिकमध्ये मनसेचे तीन आमदार निवडून आले होते. तर 2012 साली नाशिक महापालिकेत मनसेचे तब्बल 40 नगरसेवक निवडून आले. त्यानंतरच्या निवडणुकीत मात्र मनसेला नाशिकचा गड राखता आला नाही.

Pune Crime News : हिंजवडीत IT इंजिनिअर महिलेची गोळ्या झाडून हत्या; लॉजमध्ये मृतदेह सापडल्याने खळबळ

 तयारीला लागा मी येतोय - राज ठाकरे

नाशिक मध्ये लोकसभेची  तयारी सुरू झाली असताना एकेकाळी मनसेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये पक्षप्रमुख राज ठाकरे चार दिवस तळ ठोकणार आहे. 1 ते 4 फेब्रुवारी असा त्यांचा दौरा असणार आहे. मनसे (MNS) पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर तयारीला लागा मी येतोय, अशा सूचना त्यांनी दिल्याची माहिती मिळत आहे.

निवडणुकांची रणनीती आखणार

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी सरचिटणीस किशोर पाटील यांची निरिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणुकीच्या तयारीचा आढावा राज ठाकरेंकडे सादर केला आहे. नाशिकमध्ये लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकांची रणनीती आखण्यात येईल. लोकसभा निवडणुकीत मनसेकडून उमेदवार उभा केला जाणार असून नाशिकमधून दिलीप दातीर यांच्या यांच्या नावाची चर्चा आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply