Raj Thackeray : मनसेचा शिवाजी पार्कवर आज गुढीपाडवा मेळावा; राज ठाकरे काय बोलणार?

Raj Thackeray :  शिवाजी पार्कवर  आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा  पार पडणार आहे. आगामी लोकसभा निवडणूका आणि मनसेचा गुढीपाडवा मेळावा, असा योग जुळून आला आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. या सभेसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.  

आज मनसेच्या मेळाव्यात पोलीस सुरक्षा कशी असेल ते पाहू या. तिनशे पोलीस शिपाई असणार आहेत. तसंच 35 पोलीस अधिकारी सुद्धा सुरक्षेसाठी शिवाजी पार्क मैदानात आज असणार आहे. गर्दीचं नियोजन करण्यासाठी एक विशेष पथक असणार आहे. मनसे कार्यकर्त्यांना शिवाजी पार्कमध्ये येण्यास कुठलाही त्रास होऊ नये, म्हणून मनसेचे 100 सुरक्षा रक्षक असणार आहेत. ते वाहतुकीसाठी मदत करणार आहेत.सभेच्या ठिकाणी 500 स्वयंसेवक आणि 100 वॉर्डन सुद्धा उपस्थित राहणार आहेत.

Water Shortage : जायकवाडी धरणात फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक; उद्योगांवर पाणी कपातीचं सावट

आज मेळाव्यामध्ये राज ठाकरे काय संबोधित करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. महायुतीमध्ये सामील होण्याची चर्चा कुठे येऊन थांबली? भविष्यातील मनसेची  वाटचाल कशी असेल? अशा विविध विषयांवर आज राज ठाकरे बोलणार आहे. त्यासोबतच लोकसभा लढविणार की थेट विधानसभेत उतरणार हे चित्र देखील आज स्पष्ट होईल.

आज शिवाजी पार्कवरील मेळाव्यातून विविध प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. मनसे महायुतील पाठिंबा देईल का, हे चित्र देखील आज स्पष्ट होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी दिल्लीमध्ये जाऊन भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची  भेट घेतली होती. परंतु त्यांनी याबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही.

देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे आमच्यासोबत येतील, असा विश्वास काही दिवसांपूर्वी व्यक्त केला होता. हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे आमची जवळीक वाढली. त्यामुळे राज ठाकरे नरेंद्र मोदींना  पाठिंबा देतील. युतीसंदर्भात चर्चा झाल्या आहेत, आता निर्णय राज ठाकरेंना घ्यायचा आहे असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होत. त्यामुळे मनसेचा आजचा गुढीपाडवा मेळावा खास असणार आहे, मनसेची पुढील दिशा आजच्या मेळाव्यातून स्पष्ट होणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply