Rain Update : महाबळेश्वर आणि पुणे दरम्यान ढग दाटले; राज्यात पुढील दोन तास पावसाची शक्यता

पुणे : राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने याचा प्रभाव पुण्यावर ही होत आहे. शहरात गुरुवारी दुपारी चार नंतर विजांचा कडकडाटात वाऱ्यांसह पावसाला सुरुवात झाली. शहर आणि परिसरात पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.

सध्या महाबळेश्वर आणि पुणे दरम्यान ढग दाटले असून तशी ३० ते ४० किमी इतक्या वेगाने वारे वाहत आहेत. तसेच शहरासह विविध ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. तर पुढील दोन तास जिल्ह्यातील काही भागात विजांसह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरात पावसाचे चित्र कायम आहे. तर गुरुवारी (ता. १६) पुणे व परिसराला पावसाचा ऑरेंज अलर्ट देत काही भागात गारपिटीचा इशारा देण्यात आला.

येथे पावसाळा सुरवात

दुपारी चार नंतर पेठांसह उपनगरांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाळा सुरवात झाली. शिवाजीनगर, खडकवासला, शिवणे, उत्तमनगर, मुंडवा, केशवनगर, बाणेर, बालेवाडी आदी परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे.

शहर परिसरात पुढील दोन तासाचा अंदाज

हवामाशास्त्र विभागाच्या माहितीनुसार पुणे व परिसरात ४.३० ते सायंकाळी ६ या कालावधीत काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाच्या सरी पडतील.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply