Rain Update : मुंबई पाठोपाठ पुण्यात देखील वरुणराजाचे आगमन! कात्रज परिसरात मुसळधार पाऊस

Rain Update: राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसुन येत आहेत. राज्यातील काही भागामध्ये उष्णतेचा तडाखा जाणवत आहे तर काही भागात ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा पावसाने हजेरी लावली आहे.

पुण्यातील कात्रज, कर्वे नगर, चांदणी चौक भागामध्ये पावसाने हजेरी लावली आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर काही भागांमध्ये  पावसाने हजेरी लावली आहे. आज आणि उद्या राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.विदर्भाच्या काही भागामध्ये काल (शुक्रवारी) मान्सूनचं आगमन झालं आहे. तर पश्चिम विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांसह मुंबईतही काल (शुक्रवारी) सकाळी तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसल्या आहेत.

तर मुंबईतील काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. दादर, वांद्रे, अंधेरी, कुर्ला, वरळी, मुंबई सेंट्रल परिसरात पावसानं हजेरी लावलीय. पुढील ७२ तासात सलग मान्सून मुंबईत दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

मुंबईत सोमवार आणि मंगळवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील 3-4 दिवसांत महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणाच्या आणखी काही भागांमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस आणखी पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे. पुढच्या 3-4 दिवसांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

तर जून महिन्याचा शेवट आला असला तरी अजूनही राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावलेली नाही. अशात आता काही भागांमध्ये नैऋत्य मोसमी पाऊस आणखी पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल होत आहे.

मान्सून लांबल्यामुळे राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे. बळीराजा समोर मोठं संकट उभं राहील आहे. मात्र, उद्यापासून राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे हा बळीराजासाठी मोठा दिलासा असणार आहे.

पुढील 4 दिवसांमध्ये राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईतही मुसळधार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता वर्तवली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply