Rain Forecast in Maharashtra : राज्यातील काही भागात आज वादळी वारा विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

Weather Forecast : मान्सूप पूर्व पावसाने राज्यातील काही ठिकाणी हजेरी लावली आहे. याशिवाय अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याने मागील काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानाचा पारा काही प्रमाणात घसरला आहे.

आजही राज्याच्या काही भागांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी वारा विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.

पुण्यासह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज आहे. विदर्भात मात्र हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

मान्सून लांबणीवर

नैर्ऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून ४ जूनला केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. मात्र केरळमधील पावसाचे आगमन लांबले आहे. मॉन्सून अरबी समुद्रात प्रगती करत २ जूनला लक्षद्वीप बेटांचा काही भाग, दक्षिण श्रीलंका, संपूर्ण कोमोरीन भाग आणि बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात प्रगती केली. त्यानंतर मॉन्सूनची चाल मंदावली. मॉन्सून यंदा ४ जून रोजी केरळात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply