Rain Alert : राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार; या जिल्ह्यांना झोडपून काढणार, वाचा संपूर्ण वेदर रिपोर्ट

Rain Alert : राज्यात मान्सून पूर्णत: सक्रिय झाला असून सध्या अनेक भागात मेघगर्जनेसह पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील कामांना वेग दिला आहे.दरम्यान, राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार असून अनेक भागात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा, विदर्भ आणि कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात आज मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होईल, असं हवामान खात्याने म्हटलं आहे

यापार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देखील जारी करण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरात पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली आहे. येत्या ३-४ तासांत पावसाचा जोर वाढणार, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. पर्यटनासाठी घाटमाथ्यावर गेलेल्या नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलंय.

Bus Accident : मंचर जवळ दोन एसटी गाड्यांचा अपघातः तीन प्रवासी जखमी

आज या भागात पावसाची शक्यता

हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, आज कोकणातील बहुतेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस (Rain Alert) होईल. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात धुव्वाधार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसतील.

मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, आतापर्यंत ज्या भागात चांगला पाऊस झाला आहे, त्या भागातील शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना वेग दिला आहे. शेतकरी पेरणी करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहेत.

दुसरीकडे काही भागात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसलेले आहेत. चांगला पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असं आवाहन कृषी विभागाने केलं आहे. जमिनीत ६ इंच ओल गेल्यानंतरच बियाण्यांची लागवड करावी असंही कृषी खात्याने म्हटलं आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply