Railway News : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर पहिल्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्रासाठी रेल्वेकरता तब्बल २३ हजार कोटींची तरतूद करण्यात आली. महाराष्ट्रासाठी २३,७७८ कोटी रुपयांच्या विक्रमी अर्थसंकल्पीय वाटपाबाबतची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. मुंबई लोकल सेवेला अधिक सक्षम बनवण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. तसंच गर्दी कमी करण्यासाठी दिवसाला ३०० अतिरिक्त लोकल फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली.
अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, '२०२५-२६ च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला २३,७७८ कोटी रुपयांची विक्रमी तरतूद करण्यात आली आहे. २००९-१४ मध्ये महाराष्ट्राला देण्यात आलेल्या सरासरी १,१७१ कोटी रुपयांच्या वाटपापेक्षा हे जवळजवळ २० पट जास्त आहे. महाराष्ट्र या वळणावर पुढे आहे कारण रेल्वे, राज्य सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांच्यात त्रिपक्षीय करार आहे. ज्याअंतर्गत सर्व प्रकल्पांसाठी राज्य सरकारचा निधी वाटा आरबीआयकडून दिला जाऊन प्रकल्पांची अंमलबजावणी जलद होईल. महाराष्ट्रात, अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत १३२ स्थानकांवर पुनर्विकासाचे काम जलद गतीने सुरू आहे.'
Vaibhav Naik : वैभव नाईकांच्या अडचणीत वाढ, पत्नीला एसीबीची नोटीस |
रेल्वेमंत्र्यांनी पुढे सांगितले की, 'महाराष्ट्रात सध्या १,७०,००० कोटी रुपयांचे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. त्यापैकी १७,१०७ कोटी रुपयांचे ३०१ किमी लांबीचे प्रकल्प मुंबईत राबविले जात आहेत. या प्रकल्पांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कुर्ला पाचवी आणि सहावी मार्गिका, पनवेल-कर्जत डबल लाईन उपनगरीय कॉरिडॉर, ऐरोली-कळवा एलिव्हेटेड कॉरिडॉर, कल्याण-आसनगाव चौथी मार्गिका, कल्याण-कसारा तिसरी मार्गिका, कल्याण-बदलापूर तिसरी आणि चौथी मार्गिका, निळजे-कोपर डबल कॉर्ड मार्गिका यांचा समावेश आहेत.'
तसंच, 'छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, परळ, लोकमान्य टिळक टर्मिनस, कल्याण आणि पनवेल टर्मिनसची क्षमता वाढवली जाणार आहे. विविध रेल्वे अॅप्स एकत्रित करून एक सुपर अॅप विकसित केले आहे आणि त्याचे बीटा व्हर्जन गुगल प्लेस्टोअरवर उपलब्ध आहे. या आर्थिक वर्षात ५० नमो भारत ट्रेन, १०० अमृत भारत ट्रेन आणि २०० वंदे भारत ट्रेन तयार केल्या जातील. सुरक्षा वाढवण्यासाठी १,१६,००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.' , असे देखील ते म्हणाले.
शहर
- CIDCO : सिडकोच्या घराला नागरिकांची नापसंतीच, किंमती कमी होणार का?
- Dombivali News : डोंबिवलीत मेंढ्यांच्या झुंजी, मेंढ्यांवर लागला लाखोंचा सट्टा; पोलिसात गुन्हा दाखल
- Pune GBS : पुण्यात जीबीएस फोफावतोय, ४७ जण ICU मध्ये, रूग्णसंख्या १६३ वर
- Pune Crime: पुण्यात चाललंय काय? बिबवेवाडीत भरदिवसा गोळीबार, तरुण गंभीर जखमी
महाराष्ट्र
- Jalna Accident : फिरण्यासाठी घराबाहेर पडले, पुन्हा परतलेच नाही; 'त्या' तरुण-तरुणींसोबत नेमकं काय घडलं?
- Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; चालकाचे नियंत्रण सुटलं अन् ट्रक थेट...
- Sangli GBS : सांगलीत जीबीएसचा धोका वाढतोय; जिल्ह्यात रुग्ण संख्या पोहचली अकरावर
- Train Accident : एकच ट्रॅकवर २ मालगाड्या, जोरदार धडक, मोठं नुकसान, व्हिडीओ व्हायरल
गुन्हा
- Pune Crime : पुण्यात मध्यरात्रीचा थरार! सिमेंट ब्लॉक डोक्यात घातला, सराईत गुन्हेगारांनी केला तरुणाचा खून
- Kolkata : कोलकातामधील 'निर्भया'ला १६१ दिवसांनी मिळाला न्याय; आरोपी संजय रॉय दोषी, कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
- Baramati : निर्दयी बाप! अभ्यास करत नाही म्हणून केली ९ वर्षाच्या लेकाची हत्या, बारामतीमधील धक्कादायक घटना
- Pune Crime : आधी मुलाला मारलं नंतर पती-पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न; सामूहिक आत्महत्येच्या घटनेनं पिंपरी-चिंचवड हादरलं!
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी
देश विदेश
- Union Budget 2025 : देशाचा अर्थसंकल्प समजून घ्या महाराष्ट्राचे CM फडणवीस आणि DCM शिंदे यांच्या नजरेतून; वाचा काय म्हणाले...
- Nirmala Sitharaman Budget Saree : निर्मला सीतारामन यांच्या साडीनं वेधलं लक्ष, पांढऱ्या सोनेरी बॉर्डरच्या साडीचं आहे बिहार कनेक्शन
- Mahakumbh Fire : चेंगराचेंगरीनंतर महाकुंभमेळ्यात भीषण आग! अनेक तंबू आगीच्या भक्षस्थानी, घटनेनं खळबळ
- Mahakukbh Mela Stampede : कुंभमेळ्यात चेंगराचेंगरीची घटना कशी घडली? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव