Railway Block : पश्चिम रेल्वेवर दोन दिवस स्पेशल ब्लॉक; १२७ लोकल रद्द; ७ मेल एक्सप्रेसवर परिणाम

 

Railway Block : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेवर आज रात्रीपासून ते रविवारपर्यंत स्पेशल ब्लॉर असणार आहे. मिठी नदीवरील पूल पुनर्बांधणीच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात आला आहे. शुक्रवार- शनिवार या काळात रात्री ब्लॉक असणार आहे.

शुक्रवारी १२७ पश्चिम रेल्वेच्या लोकल फेऱ्या रद्द राहणार आहे. त्यातील ६० लोक अंशतः रद्द असणार आहेत. शुक्रवारी रात्री ११.५८ मिनिटांनी चर्चगेटवरुन विरारसाठी शेवटची लोकल धावणार आहे.

शुक्रवार रात्री ११ ते शनिवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत अप आणि डाउन धीम्या मार्गावर ब्लॉक असणार आहे. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम करण्यात येणार आहे.

चर्चगेटवरुन सुटणाऱ्या सर्व लोकल मुंबई सेंट्रल ते सांताक्रूझदरम्यान जलद मार्गावर धावणार आहे. तर विरारवरुन सुटणाऱ्या सर्व धीम्या लोकल सांताक्रूझ ते मुंबई सेंट्रलपर्यंत जलद मार्गावर धावणार आहे. चर्चगेट ते दादर आणि गोरेगाव ते वांद्रेदरम्यान अतिरिक्त लोकल सोडण्यात येणार आहे. शनिवारी सकाळी विरार, नालासोपारा, बोरिवली येथून सोडणाऱ्या सर्व गाड्या अंधेरीपर्यंतच धावणार आहेत.

Bhandara News : भंडारा हादरलं! स्फोटकं बनवणाऱ्या कंपनीमध्ये मोठा स्फोट, ५ जणांचा मृत्यू; अनेक जण जखमी

याचसोबत दुसरीकडे वाणगाव आणि डहाणू रोडदरम्यान रेल्वे उड्डाणपुलाच्या गर्डर उभारणीसाठी ब्लॉक असणार आहे. पश्चिम रेलेव्ने २५ ते २६ जानेवारी रोजी एक तासाचा ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे सात मेल एक्सप्रेसवरदेखील परिणाम होणार आहे. या लोक विलंबाने धावतात.

२५ जानेवारीला १२२९० अजमेर- दादर लोकल ३५ मिनिटे उशीरा सुटणार आहे. १२९८० जयपूर वांद्रे लोकल २५ मिनिटे उशीरा सुटणार आहे. १२९३२ अहमदाबाद- मुंबई सेंट्रल डबल डेकर लोकल २० मिनिटे उशीरा सुटणार आहे. ८२९०२ अहमदाबाद - मुंबई सेंट्रल तेजस लोकल २० मिनिटे उशीरा सुटणार आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply