Railway Block : पश्चिम रेल्वेवर शुक्रवार ते रविवार स्पेशल ब्लॉक; लोकलच्या ४२७ फेऱ्यांवर होणार परिणाम

Railway Block : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. माहीम ते वांद्रे स्थानकादम्यान एक विशेष ब्लॉक ठेवण्यात येणार आहे. २४ ते २५ जानेवारीला रात्री हा विशेष ब्लॉक असणार आहे. मिठी नदीवरील पुलाच्या पुनर्बांधणीसाठी हा ब्लॉक असणार आहे. यामुळे लोकलच्या ४२७ फेऱ्यांवर परिणाम होणार आहे.

पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांनी ब्लॉकची माहिती घेऊनच प्रवास करावा. पश्चिम रेल्वेच्या वांद्रे ते माहीम स्थानकामध्ये मिठी नदीवर स्क्रू ब्रिज आहे. पुलाच्या एका खांबाचे मजबुतीकरण केले जाणार आहे. त्यामुळेच शुक्रवारी ११ ते शनिवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत धीम्या मार्गावर ब्लॉक असणार आहे. तर रात्री १२.३० ते सकाळी ६.३० वाजेपर्यंत जलद मार्गावर ब्लॉक असणार आहे. त्यामुळे १२७ लोक पूर्णतः आणि ६० लोक अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत.

शनिवारी रात्री ११ ते सकाळी ८.३० वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. त्यामुळे अप-जलद मार्गावरील १५० लोकल रद्द केल्या आहेत. तर ९० लोक अंशतः रद्द केल्या आहेत.

या ब्लॉकमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे. शुक्रवारी रात्री शेवटची चर्चगेट-विरार लोकल ११.५८ मिनिटांनी धावेल. त्यानंतर ब्लॉक कालावधीत सर्व धीम्या गाड्या या जलद मार्गावरुन धालणार आहे.त्यामुळे धीम्या मार्गावर गाड्या थांबणार नाही. शनिवारी सकाळी विरारमधून पहिली लोक ५.४७ मिनिटांनी निघेल. तर चर्चगेटमधून पहिली लोकल ६.१४ वाजता धावणार आहे.

शनिवारी ब्ल़ॉकच्या कालावधीत चर्चगेट ते दादरदरम्यान जलद गाड्या धावतील. शनिवारी सकाळी विरार, नालासोपारा, वसई रोड, बोरिवली येथून फक्त अंधेरिपर्यंतच गाड्या धावणार आहे. अप-जलद मार्गावर शेवटची लोक १०.०८ मिनिटांनी धावणार आहे. तर दलद मार्गावर चर्चगेट ते बोरिवली रात्री १०.३३ मिनिटांनी धावणार आहे. रविवारी सकाळी जलद मार्गावर विरार-चर्चगेट लोक ७.३८ मिनिटांनी धावणार आहे. तर चर्चगेट विरार लोक ८.३५ मिनिटांनी धावणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply