Raigad Rain News: रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस.. मुंबई- गोवा महामार्गावर पाणीच पाणी; पुण्यातही बरसल्या सरी

Raigad Rain News : गणेश चतुर्थीपासून राज्यात सक्रीय झालेला पाऊस अनेक भागांत बरसत आहे. नागपूरला काल पावसाने अक्षरश: झोडपून काढलं. नागपूरसह पुणे, अहमदनगर, जळगाव आणि बीडमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. रायगड जिल्ह्यातही आज (रविवार, २४ सप्टेंबर) पावसाचा जोर वाढल्याचे पाहायला मिळाले.

याबाबत अधिक माहिती अशी की, राज्यात पावसाचे जोरदार पुनरागमन केल्याने बळिराजाला दिलासा मिळाला आहे.  नागपुर, बीडनंतर आता रायगड जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढला असून जिल्ह्यात विविध भागात मुसळधार पाऊस कोसळला.

जिल्ह्याच्या माणगाव ते नागोठणे परिसरात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. या दमदार पावसाने मुंबई गोवा महामार्गाला नाल्याचे स्वरुप आले असून महामार्गावर पाण्याचे लोंढे वाहायला लागले. महामार्गावरील सुकेळी खिंडीनजिक पावसाचे पाणी साचल्याने वाहन चालकांची चांगलीच तारांंबळ झाल्याचे पाहायला मिळाले.

Nagpur Floods : नागपुरातील जनजीवन पूर्वपदावर; पुरामुळं १ हजार घराचं नुकसान, उपमुख्यमंत्र्यांकडून पूरग्रस्त भागांची पाहणी

पुण्यातही जोरदार पाऊस...

पुणे शहरातही सलग दुसऱ्या दिवशी दुपारच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. अचानक आलेल्या पावसामुळे गणेशोत्सवासाठी आलेल्या भाविकांची चांगलीच धावपळ झाली.

हवामान खात्याने दिला होता इशारा...

दरम्यान, आज विदर्भ, कोकणात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply