Irshalwadi Landslide : इर्शाळवाडीमधील ग्रामस्थांच्या मदतीला ‘लालबागचा राजा’ निघाला; आज मोठी मदत घेऊन रवाना होणार

Raigad Irshalwadi Landslide: रायगड जिल्ह्यात बुधवारी (ता. १९) रात्रीच्या सुमारास एक मोठी दुर्घटना घडली. खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळल्याने अख्खं गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली गेलं. या दुर्घटनेत आतापर्यंत १६ जणांना आपला जीव गमवावा लागला. अजूनही जवळपास १०० जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.

आज सकाळपासून पुन्हा बचावकार्य सुरू होणार आहे. गावातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. दरम्यान, इर्शाळवाडी ग्रामस्थांच्या मदतीला मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंडळ लालबागचा राजा धावून आला आहे.

इर्शाळवाडीतील ग्रामस्थांना मदत करण्याचा निर्णय लालबागचा राजा मंडळाने घेतला आहे. या भीषण दुर्घटनेमधून बचावलेल्या नागरिकांना लालबागचा राजा सार्वाजनिक गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते मोठी मदत करणार आहेत.

ज्यामध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांचे सर्व अत्यावश्यक कपडे, खाण्यासाठी सुका खाऊ, अन्नपदार्थ, ग्रामस्थांसाठी तसेच मदतकार्य करणाऱ्या प्रशासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी लागणाऱ्या सर्व जीवनाश्यक पदार्थ आणि वस्तूंचा यात समावेश करण्यात आला आहे.

Maharashtra Rain Updates: राज्यात शुक्रवारीही राहणार पावसाचा जोर कायम; 2 जिल्ह्यांना रेड, तर 4 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी

शुक्रवारी सकाळी १० वाजता ही मदत लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वार येथून इर्शाळवाडीकडे रवाना होणार आहे. दरम्यान, मातीच्या ढिगाऱ्याखाली अनेक घरे गाडली गेल्याने मृतांचा आकडा वाढण्याचा धोका आहे. या वाडीत अंदाजे २५ ते २८ कुटुंबांचे वास्तव्य होते. दरम्यान या गावाचे लवकरच पुनर्वसन करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply