Raigad Fort Trek News : शिवप्रेमींसाठी महत्वाची बातमी, किल्ले रायगडावरील पायरी मार्ग राहणार दाेन दिवस बंद; जिल्हाधिका-यांचा आदेश

Raigad Fort Trek News :  किल्ले रायगड येथे सध्या डागडुजीचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे बुधवारी (ता. 23 मे) व गुरुवारी (ता. 24 मे) असे दाेन दिवस पायरी मार्ग पर्यटक, शिवभक्तांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. याची नाेंद शिवभक्त व पर्यटकांनी घ्यावी असे अवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.

किल्ले रायगड येथे येत्या 6 जून रोजी 351व्या शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याला संपूर्ण राज्यभरातील शिवभक्त शिवरायांना वंदन करण्यासाठी रायगडावर येत असतात. या साेहळ्याला किल्ले रायगडावर माेठ्या प्रमाणात शिवभक्तांची गर्दी राहणार.

गडावर काही ठिकाणी दरड कोसळून अपघात घडण्याची शक्यता लक्षात घेता. जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधक उपाय करण्यासाठी व धोकादायक सुट्टे दगड काढण्याचे काम गिर्यारोहकांच्या सहाय्याने करण्यात येणार आहे.

ही बाब लक्षात घेता किल्ले रायगड येथे काही उपाययोजना करण्यासाठी व खबरदारी म्हणून 23 व 24 मे या दिवशी गडावर जाणारे पायरी मार्ग पर्यटक व शिवभक्तांसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत.

तरी गडावर जाणारे पायरी मार्ग दोन दिवस बंद राहणार असल्याची नोंद शिवभक्त व पर्यटकांनी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी जावळे यांनी केले आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply