Raigad Crime News : रायगड जिल्ह्यात पोलिसांची मोठी कारवाई, अमलीपदार्थांचा कारखाना उदध्वस्त, १०० कोटींचा साठा जप्त

Raigad Crime News : रायगडच्या खोपोली पोलिसांनी मोठी कारवाई करत अमलीपदार्थ बनवणारा कारखानाच उदध्वस्त केला आहे. या कारवाईत १०० कोटी ५० लाखांचा अमली पदार्थांचा साठा हस्तगत करण्यात आला आहे. तर 15 लाख रुपयांचे कच्चे रसायन आणि 65 लाखांची यंत्र सामुग्री जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी मोस्ट वॉन्टेड सह तिघांना अटक करण्यात आली आहे.

Ajit Pawar : पिंपरी - चिंचवडमध्ये लागलेल्या आगीची उच्चस्तरीय चौकशी होणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इलेक्ट्रिक पोल बनवण्याच्या नावाखाली खोपोलीतील ढेकू गावात अमलीपदार्थांचा कारखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून खोपोली पोलिसांनी या कारखान्यावर धाड टाकली. मात्र तिथे सुरू असलेला प्रकार पाहुन पोलीसही चक्रावले. चक्क अमलीपदार्थ बनवण्याचा कारखानाच सुरू होता. पोलिसांनी तात्काळ कारखाना सील केला आणि अमलीपदार्थांचा साठा, साहित्य जप्त केले. अमलीपदार्थ आणि साहित्याची किंमत अंदाजे तब्बल १०७ कोटी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या नेतृ्त्वात ही कारवाई करण्यात आली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply