IPL 2024 Rahul Tripathi : डोळ्यात पाणी; 'हा...ना...'च्या गोंधळात राहुल त्रिपाठी झाला रन आऊट, काव्या मारन पण झाली हैराण

Rahul Tripathi Emotional Reaction Goes Viral : नरेंद्र मोदी स्टेडियमवर काही महिन्यांपूर्वी एकदिवसीय विश्वकरंडक उंचावणाऱ्या पॅट कमिन्सवर आयपीएलमध्ये मात्र त्याच मैदानावर पराभवाचा सामना करण्याची वेळ आली. क्वॉलिफायर-१ सामन्यात कोलकताने ८ विकेट आणि ३८ चेंडू राखून विजय मिळवत यंदाच्या आयपीएलची अंतिम फेरी गाठली.

पॅट कमिन्स नेतृत्व करत असलेल्या हैदराबाद संघासाठी अजून सर्व काही संपलेले नाही. अंतिम फेरीसाठी क्वालिफायर-२ सामना खेळण्याची संधी मिळणार आहे. हा सामना चेन्नईत गुरवारी होणार आहे.

यंदाच्या स्पर्धेत तीनदा अडीचशेपार धावा करण्याचा दरारा निर्माण करणाऱ्या हैदराबादला आज कोलकताच्या भेदक माऱ्यासमोर पूर्ण षटके फलंदाजी करता आली नाही. १५९ धावांत त्यांनी शरणागती स्वीकारली. हे आव्हान कोलकताने १३.४ षटकांत पूर्ण केले.

अहमदाबादमध्ये हेड अपयशी

अहमदाबादच्या याच मैदानावर ट्रॅव्हिस हेडने विश्वकरंडक अंतिम सामन्यात भारतीय गोलंदाजीची पिसे काढली होती. तो भोपळाही फोडू शकला नाही. हैदराबादच्या गेल्या सामन्यातही तो शून्यावर त्रिफाळाचीत झाला होता. स्टार्कने नंतर नितीश कुमार रेड्डी आणि शाहबाद अझमद यांना बाद केले. त्यामुळे हैदराबादची ५ व्या षटकातच ४ बाद ३९ अशी अवस्था झाली.

Gautam Gambhir : 'मी त्यांचे पाय धरले नाही म्हणून...' गौतमच्या गंभीर वक्तव्याने खळबळ

एका बाजूने किल्ला लढवणाऱ्या राहुल त्रिपाठीने अर्धशतक केले आणि त्याने क्लासेनसह अर्धशतकी भागीदारी करत संघाला १० षटकांत शंभरी गाठून दिली. राहुल धावचीत झाला आणि हैदराबादच्या संकटात आणखी भर पडली.

14व्या षटकात 34 चेंडूत 55 धावा केल्यानंतर राहुल त्रिपाठी खेळत होता. त्रिपाठीने 7 चौकार आणि 1 षटकार मारला होता. सुनील नारायण त्या षटकातील दुसरा चेंडूवर अब्दुल समदने बॅकवर्ड पॉईंटवरून धाव चोरण्याचा प्रयत्न केला, परंतु येथे उभा असलेला आंद्रे रसेलने उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन करत, चेंडू यष्टिरक्षक रहमानउल्ला गुरबाजकडे फेकला. अशात राहुल त्रिपाठी रन आउट झाला आणि त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.

पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर, राहुल त्रिपाठी ड्रेसिंग रूमच्या बाहेर पायऱ्यांवर भावुकपणे बसलेला दिसला. आणि हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामुळे हैदराबादच्या चाहत्यांना दुःख झाले. धावबाद होण्याची ही घटना पाहून हैदराबाद संघाची मालकीण काव्या मारनही उदास दिसत होती आणि तिची प्रतिक्रियाही व्हायरल झाली.

फिल साल्ट मायदेशी परतल्यामुळे सलामीला संधी मिळालेल्या रेहमतुल्ला गुरबाझ याने आपली जबाबदारी चोख पार पाडली. १४ चेंडूत २३ धावा करताना साल्टची अनुपस्थिती जाणवू दिली नाही. त्यामुळ कोलकताने ३.२ षटकांत ४४ अशी सुरुवात केली. गुरबाझ आणि सुनील नारायण बाद झाले, परंतु तोपर्यंत त्यांनी संघाच्या विजयाचा पाया रचला होता.

व्यंकटेश अय्यर आणि श्रेयस अय्यरने हैदराबादच्या उरल्यासुरल्या आशाही हळूहळू संपुष्टात आणल्या. श्रेयसने तर ट्रॅव्हिस हेडच्या एका षटकात चार चेंडूतच २२ धावा फटकावून १४ व्या षटकात विजयावर शिक्कामोर्तब केले.

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply