Rahul Solapurkar : राहुल सोलापूरकरांनी दिला भांडारकर संस्थेच्या विश्वस्तपदाचा राजीनामा

Rahul Solapurkar : अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी भांडारकर संस्थेच्या विश्वस्त पदाचा राजीनामा दिलाय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी राहुल सोलापूरकर हे अडचणीत आले होते. सोलापूरकर यांनी केलेल्या विधानावरून भाजप खासदार उदयनराजे भोसले चांगलेच आक्रमक झाले . सोलापूरसारख्या लोकांना गोळ्या घातल्या पाहिजे. जेथे दिसतील तेथे त्यांना ठेचून काढलं पाहिजे, अशा शब्दात उदयनराजे भोसले यांनी राहुल सोलापूरकरांना सुनावलं.

काय म्हणाले होते अभिनेत राहुल सोलापूरकर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाविषयी बोलताना सोलापूरकरांनी हिरकणीचं अस्तित्व नाकारलं. सोलापूरकर म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिस्तीचं मोठेपण कळावे, यासाठी हिरकणीची कथा रचली गेली. गडाचे दरवाजे सूर्यास्ताला बंद व्हायचे वगैरे सांगतात. मात्र हिरकणी घडलेलीच नाही, असा इतिहासाच नसून पण लिहिलं गेलं. तसेच आग्रा येथील सुटकेप्रकरणी बोलतानाही राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त विधान केलं होतं.

Dhananjay Munde : करुणा शर्मांना देखभाल खर्च देण्याचे धनंजय मुंडेंना आदेश, कोर्टात काय-काय झालं?

त्यानंतर राहुल सोलापूरकर यांच्याविरोधात शिवप्रेमींनी आंदोलने केली होती. राजकीय वर्तुळातूनही राहुल सोलापूरकरवर टीका केली जात होती. त्यानंतर आज राहुल सोलापूरकर यांनी भांडारकर संस्थेचा राजीनामा दिला होता. दरम्यान शिवद्रोही राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर नाक घासून पुण्यात माफी मागितल्याशिवाय शिवप्रेमी शांत बसणार नाहीत? सोलापूरकर हा RSS चा दलाल आहे? भांडारकर संस्थेतील ही पिलावळ अशीच वारंवार वळवळ करत राहील. संभाजी ब्रिगेड राहुल सोलापूरकरला सोडणार नाही, अशी भूमिका संभाजी ब्रिगेड यांनी भूमिका घेतली होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply