Rahul Gandhi : राहुल गांधींनी केली RSS ची मुस्लिम ब्रदरहुड बरोबर तुलना, ब्रिटिश संसदेतील वक्तव्य वादात

Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या ब्रिटन दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी लंडनमधील संसदेच्या सभागृहाच्या आवारात ब्रिटिश खासदारांशी संवाद साधला. हाऊस ऑफ कॉमन्सच्या ग्रँड कॉमेंट रूममध्ये, विरोधी पक्षाचे भारतीय वंशाचे खासदार वीरेंद्र शर्मा यांनी एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी भारतातील राजकारणाविषयी बोलताना राहुल गांधी यांनी आरएसएसची तुलना मुस्लिम ब्रदरहुड बरोबर केली

राहुल गांधी यांनी आरएसएसला फॅसिस्ट म्हटले

लंडनस्थित थिंक टँक चॅथम हाऊसमध्ये राहुल गांधींनी आरएसएसवर जोरदार निशाणा साधला. भारतातील लोकशाही स्पर्धेचा मार्ग पूर्णपणे बदलला आहे. याला कारण आहे आरएसएस नावाची संघटना. ही एक कट्टरपंथी आणि फॅसिस्ट संघटना आहे. ज्याने भारतातील जवळपास सर्व संस्थांवर कब्जा केला आहे. मुस्लीम ब्रदरहुडच्या धर्तीवर आरएसएसची बांधणी झाली आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

यासोबतच, काँग्रेस १० वर्षे सत्तेत होती. भाजप सत्तेवर येण्यापूर्वी आमची सत्ता देशावर होती भाजपला असे वाटते की, ते देशावर अनेक वर्ष राज्य करतील. पण तसे नाही. भाजप कायमची सत्तेवर राहू शकत नाही. असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं आहे.

यापूर्वी राहुल गांधी यांनी ब्रिटनमध्ये भाषण करताना मोठा दावा केला होता. माझ्या फोनमध्ये पेगासस हे हेरगिरी करणारे सॉफ्टवेअर आले होते. फक्त माझ्याच नव्हे तर भारतातील इतर अनेक नेत्यांच्या फोनमध्येही हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यात आले होते.भारतात लोकशाही धोक्यात आहेत. अल्पसंख्यांकांवर हल्ले होत आहेत. एवढंच नाही तर सरकारने सर्वच संस्थांवर ताबा घेतलाय. माध्यम आणि कोर्टावरही सरकारने कब्जा केल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply