Rahul Gandhi : राहुल गांधी ठरले दोषी! कोर्टानं सुनावली दोन वर्षांची शिक्षा; काय आहे प्रकरण?

सूरत : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना सूरत कोर्टानं मानहानी प्रकरणात दोषी ठरवलं आहे, यामध्ये त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. हा राहुल गांधी यांना मोठा झटका मानला जात आहे. मोदी या आडनावावरुन त्यांनी टिप्पणी केली होती, त्यामुळं त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणात राहुल गांधींना जामीनही मंजूर झाला आहे.

मोदी आडनावावरुन राहुल गांधी यांनी टिप्पणी केली होती. त्यामुळं त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी सूरत कोर्टात आज सुनावणी होती, या सुनावली हजेरी लावण्यासाठी राहुल गांधी सकाळीच दिल्लीहून विमानानं सूरतकडे रवाना झाले होते. सूरतमध्ये पोहोचताच त्यांच्याविरोधात कोर्टाचा निकाल आला.

काय आहे प्रकरण?

2019 च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान कर्नाटकात राहुल गांधींनी हे विधान केलं होतं. त्यांच्याविरोधात भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी भादंवि अंतर्गत मानहानीचा दावा दाखल केला होता. त्यावर सूरच्या जिल्हा कोर्टानं राहुल गांधींविरोधात निकाल देत त्यांना दोषी ठरवलं आणि दोन वर्षांची शिक्षा सुनावली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply