Rahul Gandhi : 'ईव्हीएमशिवाय मोदी लोकसभा निवडणूक जिंकू शकत नाहीत', राहुल गांधींची तोफ धडाडली

Rahul Gandhi : 'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ईव्हीएमशिवाय लोकसभा निवडणूक जिंकू शकत नाहीत', असं काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले आहेत. शिवाजी पार्कमधील भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोप सभेत ते असं म्हणाले आहेत.

ते म्हणाले, ''राजाचा आत्मा ईव्हीएम, सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्समध्ये आहे, असे कुणीतरी सांगितले. याच राज्यातील एका ज्येष्ठ नेत्याने काँग्रेस सोडली आणि माझ्या आईला रडत म्हटले की, मला लाज वाटते की, या सत्तेशी लढण्याची हिंमत माझ्यात नाही, मला तुरुंगात जायचे नाही. या प्रकाराने हजारो लोक घाबरले आहेत.'' 

Fraud Marriage: पैशांचा लोभ.. भाऊ-बहिणीलाच घ्यायला लावले 'सात फेरे'; प्रकरण नेमकं काय?

राहुल गांधी म्हणाले, ''हा देश ९० अधिकारी चालवत आहेत. मी आतून व्यवस्था पाहिली आहे. म्हणूनच मोदीजी मला घाबरतात. माझ्यापासून काहीही लपून राहू शकत नाही. त्यातील तीन अधिकारी मागास वगार्तील आहेत. ३ दलित आहेत. हे ९० लोक पॉलिसी बनवतात. हीच खरी शक्ती भारत चालवत आहे.''

ते म्हणाले, ''इथे कोणीतरी ईव्हीएमबद्दल बोलले. नरेंद्र मोदी ईव्हीएमशिवाय निवडणूक जिंकू शकत नाहीत. आम्ही निवडणूक आयोगाला हे यंत्र विरोधी पक्षाला दाखवण्यास सांगितले. ते कसे चालते ते आम्हाला, असं सांगितलं.''

राहुल गांधी पुढे म्हणाले, ''तुम्ही लोक (सभेला जमलेले लोक ) जीएसटी भरता, तेवढीच रक्कम अदानी देतात. तुम्ही शर्टवर १८ टक्के जीएसटी भरता, अदानी सुद्धा तितकेच भरतो. मग हा पैसा जातो कुठे? तुमचे लक्ष दुसरीकडे वळवणे हे नरेंद्र मोदी यांचे काम आहे. कधी ते म्हणतील, चीनकडे बघा, पाकिस्तानकडे बघा. कधीतरी ते तुम्हाला मोबाईलची लाईट ऑन करायला सांगतील. कधी म्हणतील माझा अपमान करण्यात आला. मात्र आज भारतात सर्वाधिक बेरोजगारी आहे.''



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply