Queen Elizabeth II Death : भारतात एक दिवसाचा राष्ट्रीय शोक पाळण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

Britain Queen Elizabeth II Passes Away : इतिहासात ब्रिटनच्या सिंहासनावर प्रदीर्घ काळ विराजमान असलेल्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे काल (गुरुवार) वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या ९६व्या वर्षी स्कॉटलंडमधील बाल्मोरल येथील प्रासादात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तर, या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक दिवसाचा राजकीय शोक पाळण्याच निर्णय घेतला आहे.

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर ११ सप्टेंबर रोजी संपूर्ण भारतामध्ये एक दिवसाचा राष्ट्रीय शोक पाळण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. अशी माहिती गृह मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

राणी एलिझाबेथ यांनी ७०हून अधिक वर्षे ब्रिटन, तसेच काही राष्ट्रकुल देश आणि स्वायत्त ब्रिटिश वसाहतींचे राष्ट्रप्रमुखपद सांभाळले. ब्रिटनच्या राजसिंहासनावर सर्वाधिक काळ राहिलेली व्यक्ती हा विक्रम राणी एलिझाबेथ यांच्या नावावर नोंदवला गेला आहे.

स्कॉटलंडमधील सुटीकालीन प्रासादामध्ये आराम करण्यासाठी गेल्या असताना एलिझाबेथ यांची प्रकृती खालावली. याबाबत माहिती मिळताच राजघराण्याच्या सर्व सदस्यांनी स्कॉटलंडकडे धाव घेतली. एलिझाबेथ यांच्या निधनानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र चार्ल्स ब्रिटनच्या सिंहासनावर बसतील. ते गुरूवारची रात्र स्कॉटलंडमध्येच राहणार असून शुक्रवारी लंडनला परतणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply