Pushpak Express Accident : जळगाव रेल्वे दुर्घटनेतील मृतांचा आखडा १३ वर, 7 जणांची ओळख पटली; पाहा मृतांची यादी

Pushpak Express Accident : जळगावमधील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी सायंकाळी ४ च्या सुमारास भीषण रेल्वे अपघाताची घटना घडली. या अपघातातील मृतांचा आकडा १३ वर पोहचला आहे. मृतांमधील ७ जणांची ओळख पटली. तर या अपघातामध्ये २५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांवर पाचोरा आणि जळगाव येथील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबईच्या दिशेने येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरली आणि घाबरलेल्या प्रवाशांनी रेल्वे रुळावर उड्या मारल्या. त्याचवेळी दुसऱ्या बाजून येणाऱ्या बेंगळुरू एक्स्प्रेने या प्रवाशांना धडक दिली. हा अपघात ऐवढा भीषण होता की, यामध्ये अनेक प्रवासी दूरवर फेकले गेले. कोणाचा हात, कोणाचा पाय तर कोणाचे डोकं इकडे तिकडे उडाले. अक्षरश: अपघात स्थळावर मृतदेह अस्थव्यस्थ पडले होते. अनेक जखमी मदतीची वाट पाहत होते.

अपघात स्थळावर एकच गोंधळ उडाला. सर्व प्रवासी मदतीसाठी सैरावैरा पळू लागले होते. या अपघाताबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली. पुष्पक एक्स्प्रसमध्ये असलेल्या चहा विक्रेत्याने आग लागल्याचे सांगितले आणि ही अफवा संपूर्ण ट्रेनमध्ये पसरली आणि प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारल्या आणि होत्याचे नव्हते झाले. या अपघातामध्ये १३ निष्पापांचा बळी गेला. तर २५ जण जखमी झाले.

Guillain Barre Syndrome: पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचा धोका वाढला, रुग्णाचा आकडा ५९ वर; काय आहेत लक्षणं?

या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या १३ पैकी फक्त ७ जणांची ओळख पटली आहे. तर उर्वरीत मृतांची ओळख पटवण्याचे काम जळगाव पोलिसांकडून सुरू आहे. ओळख न पटलेले ३ जण हे अंदाजे ३० ते ४५ वयोगटातील आहेत. सध्या जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.

 


ओळख पटलेलेल्या मृतांची नावं -

- कमला भंडारी, ४३ वर्षे - नेपाळ

- लच्चीराम पासी - ४० वर्षे - नेपाळ

- इनतियाज अली - ३५ वर्षे- उत्तर प्रदेश

- नसुरूद्दीन सिद्दकी - १९ वर्षे - उत्तर प्रदेश

- हिमू विश्वकर्मा - ११ वर्षे - नेपाळ

- बाबू खान - २७ वर्षे - उत्तर प्रदेश

- जावाकाला भाटे जायकाडी - ६० वर्षे- नेपाळ

ओळख पटलेलेल्या जखमींची नावं -

- अबू मोहम्मद - ३० वर्षे - उत्तर प्रदेश

- हकीम अन्सारी - ४५ वर्षे - उत्तर प्रदेश

- हसन अली - १९ वर्षे - उत्तर प्रदेश

- विजयकुमार गौतम - ३३ वर्षे - उत्तर प्रदेश

- उत्तम हरजान - २५ वर्षे - उत्तर प्रदेश

- मोहम्मद निब्बर - ३१ वर्षे - उत्तर प्रदेश

- हयुजाला सावंत - ३८ वर्षे - नेपाळ

- दीपक थापा - १८ वर्षे - नेपाळ

- धर्मा बहादूर सावंत - ८ वर्षे - नेपाळ

- मंजू परीहार - २५ वर्षे) नेपाळ

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply