Purandra Airport : पुरंदर विमानतळाच्या अडचणी संपुष्टात; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

Pune : पुणे - पुरंदरच्या विमानतळासंदर्भात संरक्षण मंत्रालयाबरोबरच आज केंद्रीय नागरी विमान वाहतूक महासंचालकांचीही परवानगी प्राप्त झाली. निर्धारित '१ए' या जागेसंबंधीच्या तांत्रिक अडचणी ९९ टक्के संपुष्टात आल्या असून, जमीन अधिग्रहणाचा विषयही राज्य सरकारच्या माध्यमातून सोडविण्यात येईल, अशी माहिती माहिती केंद्रीय नागरी उड्डाण व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर नवनिर्वाचित खासदार मोहोळ यांचे पुण्यात आगमन झाले. त्यानिमित्त पुणे श्रमिक पत्रकार संघाने त्यांचा वार्तालाप आयोजित केला. त्या वेळी मोहोळ म्हणाले, 'चाळीस वर्षांनंतर पुण्यातील लोकनिर्वाचित खासदाराला थेट मंत्रिपदाचा मान मिळाला आहे. पुणेकरांच्या अपेक्षा नक्कीच वाढल्या आहेत. या जबाबदारीनेच पुढील ५० वर्षांचा विचार करीत पुण्याला सर्वोत्तम शहर बनवायचे आहे.'

Uddhav Thackeray : "उद्धव ठाकरे फोन उचलत नाहीत," नाना पटोलेंच्या आरोपावर ठाकरे काय म्हणाले?

पुण्याच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन काम करायचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. या वेळी पुणे पत्रकार संघाचे अध्यक्ष पाडुरंग सांडभोर, सरचिटणीस सुकृत मोकाशी उपस्थित होते.

वॅम्नीकॉमसाठी प्रयत्न

देशात सहकार विद्यापीठ करण्याची घोषणा यापूर्वीच झाली आहे. मात्र पुण्यातील वैकुंठभाई मेहता सहकारी व्यवस्थापन संस्थेला (वैनीकॉम) सहकार विद्यापीठांचा दंर्जा देता येईल का याची चर्चा सुरु आहे. हीच संकल्पना अमलात आणणे महत्त्वाचे वाटत आहे.

मोहोळ म्हणाले,

• राज्यात सहकाराची पाळेमुळे खोलपर्यंत रुजल्याने या क्षेत्रात खूप काम करण्याची गरज

• राष्ट्रीय सहकारी धोरण अंतिम टप्प्यात असून ते लवकरच जाहीर होणार

• पुणे जिल्ह्यात एकूण सहा खासदार असून त्यांची टिकासासाठी मदत घेणार

• पुणे विमानतळाच्या विस्तारासाठी ३५ एकर जमिनीच्या अधिग्रहणासाठी प्रयत्न

• नवीन टर्मिनलसाठी काही दिवसात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची (सीआयएसएफ) तुकडी दाखल होणार

• पुणे विमानतळावरील सर्व विकासकामे पूर्ण करणाए

• राज्यातील सर्व विमानतळांचा आढावा घेणार, विस्तार आणि वाढ करणार

पुणेकरांसाठी १०० टक्के उपलब्ध असणार



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply