
Pune : पुणे जिल्हा परिषदेवर आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे जिल्ह्यात ‘राष्ट्रवादी’कडून जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार होऊ शकला नाही. भाजपने बाहेरून नेत्यांना प्रचारासाठी पाठवले नाही; तरीही जिल्ह्यात झालेले मतदान आणि सध्याची परिस्थिती पाहता जिल्हा परिषदेवर कोणाचा झेंडा फडकणार, याची उत्सुकता लागून राहिली आहे.
अजितदादांच्या झंझावाताशिवाय निवडणूक
अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यामुळे पुण्यासह महाराष्ट्रावर शोककळा पसरली. बारामती दु:खात बुडाली आहे. स्थानिक नेत्यांसह उमेदवारांकडून निवडणुकांचा प्रचार करण्यात आला. उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रचार केला. अजितदादांच्या झंझावाताशिवाय ही निवडणूक खऱ्या अर्थाने निवडणूक वाटलीच नाही. निवडणुकीत रंगत भरलीच नाही. अन्य तालुक्यांत स्थानिक पातळीवर निवडणुका लढविल्या गेल्या आहेत.
|
|
कुठे काय स्थिती?
अजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतांच्या रूपाने सहानुभूती मिळाली, की नाही, हे आता मतमोजणीनंतरच चित्र स्पष्ट होईल. जिल्ह्यात पुरंदरमध्ये भाजप, शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी; जुन्नरमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी; खेडमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात शिवसेनेच्या दोन्ही गटांचे आव्हान आहे. भोरमध्ये ‘राष्ट्रवादी’समोर भाजपचे आव्हान कायम राहिले. मावळात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असेच चित्र आहे. दौंडमध्ये ‘राष्ट्रवादी’चे प्राबल्य असले, तरी आमदार राहुल कुल यांनी आता भाजपचा विस्तार करण्याची भूमिका घेतल्याने त्यांनी कंबर कसली होती.
सन २०१७ मध्ये ७५ गट होते. त्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वाधिक ४४ जागा मिळाल्या होत्या. भाजप आणि काँग्रेसला प्रत्येकी सात जागा आणि शिवसेनेला १३ जागा मिळाल्या होत्या. त्याशिवाय इतर गटांना चार जागा मिळाल्या होत्या. त्या वेळी जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला होता. यंदाही जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. दादांच्या अनुपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा मिळतील, भाजपचे संख्याबळ वाढेल का; तसेच काँग्रेस सेनेची काय स्थिती असेल, याबाबत आता गावागावांमध्ये तर्कवितर्क लढविले जात आहेत.
विजयी मिरवणुका न काढण्याचे आवाहन
अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे जिल्हा परिषदेची ही पहिलीच निवडणूक त्यांच्याशिवाय लढली गेली. या निवडणुकीचा आज, सोमवारी (नऊ फेब्रुवारी) निकाल लागणार असून, जिल्ह्यात कोणाचे वर्चस्व याचे चित्र स्पष्ट होणार आहे. निकालानंतर कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांनी विजयी मिरवणुका काढू नयेत, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘वॉर रूम’कडून करण्यात आले आहे.
‘दादांच्या अपघाती निधनाने आपण सर्व जण अजून दु:खातून पूर्णपणे सावरलो नाही. आज मतमोजणी आहे. निकाल काहीही असो, या दुःखद पार्श्वभूमीची जाणीव ठेवून आपण सर्वांनी संयम, शिस्त आणि संवेदनशीलता दाखवणे गरजेचे आहे. कोणीही विजयी मिरवणूक, गुलाल उधळणे, फटाके किंवा जल्लोषाचे प्रकार करू नयेत,’ असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संभाजी होळकर यांनी केले. आपली शिस्त, संस्कार आणि दादांप्रती असलेला आदर यातूनच दिसून येईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
- Pune : पुणे महापालिका मतदानात गोंधळ! मतदान केलं… पण मत कुणाला गेलं कळेना; मतदार चक्रावले
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी

देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel


1 thought on “Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?”