Sharad Pawar: विद्येचे माहेरघर 'कोयता गॅंग'; पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेवरुन शरद पवारांची सरकारवर टीका

Pune / Yerawada  : ‘विद्येचे आणि उद्योगाचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्याला राज्यकर्त्यामुळे आता ‘कोयता गँग’चे विशेषण चिटकले आहे. पुण्यातील तरुणाई कोणत्या तरी गोळ्या (ड्रग्ज) खाऊन थेट चंद्रावर जात असून, गुन्हेगारी, अंमली पदार्थांमुळे नवीन पिढी उद्ध्वस्त होत आहे,’ अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी सत्ताधाऱ्यांवर केली. ‘कल्याणीनगर ‘पोर्श’ कार अपघातातील जखमींना मदत करायची सोडून, इथला दिवटा आमदार पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांवर दबाव आणत होता, त्याला दमदार आमदार म्हणताना लाज वाटली पाहिजे,’ असा घणाघातही त्यांनी आमदार सुनील टिंगरेवर केला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे खराडी येथे महानिर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी माजी आमदार बापू पठारे, सुरेंद्र पठारे यांच्यासह माजी नगरसेवकांनी पवारांच्या उपस्थितीत त्यांच्या पक्षात प्रवेश केला. त्यानंतर बोलताना पवार यांनी केंद्र व राज्य सरकारवर सडकून टीका केली; तसेच पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर भाष्य केले. ‘विद्येचे माहेरघर ही पुण्याची ओळख होती. टेल्को, किर्लोस्कर, बजाज ऑटो हे औद्योगिक कारखाने पुण्याचे वैशिष्ट्य होते; परंतु आता कोयता गँग हे आजच्या काळाचे वैशिष्ट्य झाले आहे. त्यामुळे नवीन पिढी उद्ध्वस्त होत आहे,’ अशी खंत पवार यांनी व्यक्त केली.

Maharashtra : मोदी व शहा यांचे आम्ही आभार मानतो, त्यांनी आमच्या पक्षातील सर्व दोष त्यांच्याकडे घेतले – प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे प्रतिपादन

‘वडगाव शेरीत ‘दमदार आमदार’ असे बोर्ड लावले आहेत. परंतु, हा आमदार कोणाच्या तिकिटावर निवडून आला, त्याच्या पक्षाचा नेता कोण होता, राष्ट्रवादीची स्थापना कोणी केली, हे अवघ्या हिंदुस्थानाला ठावूक आहे. या आमदाराला संधी दिली. त्यानंतर तो सोडून गेला. त्यामुळे त्याचा बंदोबस्त कसा करायचा हे जनता ठरवेल. परंतु, चुकीच्या गोष्टीला पाठिंबा देणे सर्वस्वी अयोग्य आहे. या आमदाराने शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावाने मते मागितली होती. त्यावर मतदारांनी श्रद्धेने मतदान केले. त्याचे उत्तरदायित्व अशा प्रकारे देणाऱ्या या आमदाराला दमदार म्हणताना लाज वाटली पाहिजे. आमदार टिंगरे यांचा कल्याणीनगर अपघात प्रकरणाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी जाहीरपणे सांगितले आहे. चुकीच्या लोकांना मदत करून, अयोग्य गोष्टींना खतपाणी घालणारा आमदार पुन्हा मते मागायची भूमिका घेत आहे,’ अशा शब्दांत पवार यांनी टिंगरे यांचा समाचार घेतला.

आमदार सुनील टिंगरे यांच्यावर टीका
'कल्याणीनगर 'पोर्श' कार अपघातातील जखमींना मदत करायची सोडून, इथला दिवटा आमदार पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांवर दबाव आणत होता, त्याला दमदार आमदार म्हणताना लाज वाटली पाहिजे,' असा घणाघातही पवार यांनी आमदार सुनील टिंगरेवर केला. आमदार टिंगरे यांचा कल्याणीनगर अपघात प्रकरणाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी जाहीरपणे सांगितले आहे, असेही पवार म्हणाले.

‘महिलांना पैशांऐवजी संरक्षणाची गरज’
महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेवर बोलताना पवार म्हणाले, ‘या योजनेला आमचा विरोध नाही. परंतु, मुलींना पैसे देण्यापेक्षा संरक्षण देण्याची अधिक गरज आहे. बदलापूर प्रमाणे राज्यात दररोज मुलींवर अत्याचाराच्या घटना घडत आहेत. लाडकी बहीण योजनेच्या नावाने मते मागताना, मुलींचे संरक्षण करण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांना टाळता येणार नाही. आया-बहिणींकडे पाहण्याचा सरकारचा दृष्टीकोन बदलणार नसेल, तर त्यांना जागा दाखवून देऊ.’



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply