Pune weather : कसं काय पुणेकर! पारा तब्बल १० अंशावर अन् धुक्के; गुलाबी थंडी

Pune weather : गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात थंडीची लाट पसरली आहे. मात्र त्यातच पुणे जिल्हा प्रत्येक शहरात गेल्या काही दिवसांपासून वातावरण बदलले आहे. पुणे शहराला थंडीने गारठले असून पुण्याचा पारा तब्बल १०.८ अंशावर पोहचल आहे. सध्या सोशल मीडियावर पुणे शहरातील सकाळच्या वातावरणाचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. जे पाहून प्रत्येक नेटकरी थंडीने गारठला आहे.

नोव्हेंबर महिना सुरु होताच प्रत्येकजण थंडीचे(Winter) गरम कपडे परिधान करण्यास सुरुवात करतो. मात्र मुंबई असो वा पुणे या शहरात गेल्या काही वर्षापासून थंडीचा पारा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. सध्या सोशल मीडियावर पुणे(Pune) शहरातील सकाळी सकाळी अनेक ठिकाणी थंडीचे वातावरण धुके पडलेले पाहण्यासाठी मिळाले आहे.

पुणे शहरातील थंडीचा पारा १०.८ अंशावर पोहचल्याने प्रत्येकाला थंडीने हुडहुडी भरु लागली आहे. या थंडीपासून बचावासाठी नागरिक शेकोट्यांचा आधार घेऊ लागले आहे. सकाळी घराबाहेर पडताना नागरीक ऊबदार कपडे परिधान करून घराबाहेर पडतांना दिसत आहे. मात्र या थंडीचा फायदा गहू,हरभरा या पिकांना होणार आहे.

 

सोशल मीडियावर व्हायरल

पुणे शहरातील सकाळी पडलेल्या धुक्यांचा व्हिडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असून तो व्हिडिओ एक्सवरील ''@TanviPol116027'' या अकाउंटवर पोस्ट करण्यात आलेला आहे. तुम्ही या व्हिडिओत पाहू शकता, सकाळचे वातावरण आहे. प्रत्येकजण आपआपल्या कामासाठी वाहन घेऊन निघालेला आहे, पंरतू या थंडी प्रत्येकजण गारठलेला दिसून येत आहे.

थंडीमुळे आजाराचा धोका बळावला

पुणे शहरात गेल्या काही दिवासात थंडीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली मात्र, या सोबतच सर्दी आणि खोकला, ताप अशी लक्षणे असलेल्या रुग्णांच्या संख्येतही या बरोबरीने वाढ होत आहे, असे चित्र रुग्णालयात दिसत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply