Pune Warje News : पुण्यात भाजपच्या माजी पदाधिकाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल, कार्यालयात पंख्याला गळफास लावून आत्महत्या

Pune Warje News : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वारजे येथील भाजपचे माजी पदाधिकारी संजय ज्ञानोबा बराटे (वय ५६) यांनी त्यांच्या कार्यालयात पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. बराटे यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. बराटे भाजपचे माजी पदाधिकारी आणि वारजे मारुती देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष होते.

त्यांच्यामागे पत्नी एक मुलगी, विवाहित बहिणी असा परिवार आहे. वारजे येथील मारुती देवस्थान ट्रस्टचे ते माजी अध्यक्ष होते. त्यांनी ट्रस्ट सुरू करून गावातील मंदिराचा जीर्णोद्धार केला. तसेच या ट्रस्टचे राघवदास विद्यालय असून त्याचे ते सध्या अध्यक्ष होते. हवेली तालुक्याचे भाजपचे दरम्यान सरचिटणीस होते.

त्यावेळी त्यांच्या पत्नी ज्योती यांनी भाजपकडून हवेली पंचायत समितीची निवडणूक लढविली होती. त्यांनी २००७ मध्ये महापालिकेची अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यानंतर ते राजकारण सक्रिय राहिले नाही. भय्यू महाराज देशमुख यांचे ते शिष्य होते.

वारजे भागीरथीनगर येथील त्यांच्या इमारतीत सूर्योदय परिवाराचा सत्संग असायचा. अनेकवेळा भय्यू महाराज यांचे अनेक कार्यक्रम झाले. काही काळ त्यांनी बांधकाम व्यावसायिक म्हणून काम केले होते. 

वारजे एनडीए रस्त्यावर ते राहत असलेल्या इमारतीत त्यांचे कार्यालय होते. त्या कार्यालायत शुक्रवार संध्याकाळी त्यांच्या पत्नीस ते पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळले. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply