Pune Voting : पुण्यात बोगस मतदानाचा प्रकार उघड, काँग्रेस शहराध्यक्षाच्या नावाने दुसऱ्यानेच केलं मतदान

Pune Voting : पुण्यामध्ये बोगस मतदान झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. काँग्रेसच्या शहराध्यक्षाच्या नावाने दुसऱ्यानेच मतदान केले आहे. अरविंद शिंदे असं काँग्रेसच्या शहराध्यक्षांचे नाव आहे. माझ्या नावाने अगोदरच कुणीतरी मतदान करून गेल्याचे निदर्शनास आले असल्याचा आरोप केला आहे. मतदान केलेल्या व्यक्तीचे आधारकार्ड वेगळं आहे. माझ्या नावाने मतदान कसं ?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यानंतर त्यांनी टेंडर वोट केलं. माझ्या नावाने बोगस मतदान  करणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी असी मागणी त्यांनी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याचे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नावाने दुसऱ्याने मतदान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मतदान ओळखपत्रावर अनुक्रमांक एक आहे. मात्र मतदान केलेल्या व्यक्तीचे आधार कार्ड वेगळे आहे. माझ्या नावाने मतदान कसं असा सवाल अरविंद शिंदे यांनी केला आहे. हा सर्व प्रकार उघड झाल्यानंतर अरविंद शिंदे यांनी टेंडर वोट केले. आपल्या नावाने बोगस मतदान झाल्यामुळे अरविंद शिंदे चांगलेच संतप्त झाले.

Baramati Lok Sabha : मोठी बातमी! बारामतीत EVM मशीन ठेवलेल्या गोदामातील सीसीटीव्ही बंद; आमदार रोहित पवार संतापले

अरविंद शिंदे यांनी सांगितले की, 'मतदान केंद्रावर आले असता जेव्हा मी माझे ओळखपत्र दाखवले तेव्हा माझ्या नावाने मतदान झाले असल्याचे सांगण्यात आले. मी त्यांना विचारले जर माझा फोटो आहे माझ्या बोटावर शाई नाही तर माझ्या नावाने मतदान कसं झालं. रिटर्निंग ऑफिसर ऐवढे रूड आहेत. ज्यावेळी आमच्या पोलिंग एजंटने हरकत घ्यायचा विचार केला तर त्यांनी हरकत घेऊन दिली नाही. ते फक्त अनुक्रमांक पुकारतात. तुम्ही अनुक्रमांकासोबत मतदान करायला आलेल्याचे नाव पुकारले पाहिजे. तर सर्व पोलिंग एजंटला कळाले असते. पण पोलिसांमार्फत कोणत्याही पोलिंग एजंटला बोलून दिले जात नाही.', असा आरोप अरविंद शिंदे यांनी केला.

त्यांनी पुढे सांगितले की, 'मी लाइनमध्ये उभे असताना गेल्या १५ मिनिटांपासून हे सर्व पाहत होतो. जेव्हा माझी मतदान करणाची वेळ आली तेव्हा कळाले माझ्या नावाने मतदान झाले आहे. म्हणून मी चँलेज मतदान केले. त्यासाठी जी प्रोव्हिजन असते ते मी पूर्ण केली. यानुसार, १७ बीचा फॉर्म भरावा लागतो. त्यानंतर ते आपल्याला बॅलेट पेपर देतात. त्यावर मतदान करून ते सील करून त्यांच्या ताब्यात द्यावे लागतात.' तसंच, 'अत्यंत चुकीच्या पद्धतीने संपूर्ण मतदान यादीमध्ये कोणाची नावं इकडे तिकडे आहेत. जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार केल्या. ऐवढा घोळ आहे नागरिकांचा अक्षरश: छळ सुरू आहे.', असा आरोप देखील त्यांनी केला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply