Pune Voters Banner : मतदारांशी 5 वर्ष प्रामाणिक राहीन, दुसऱ्या पक्षात गेल्यास पुन्हा निवडून देऊ नका; पुणे शहरात रंगली बॅनरची चर्चा

Pune Voters Banner : ऐन निवडणूकीच्या रणधुमाळीमध्ये पुणे शहरात लागलेल्या एका बॅनरची जोरदार चर्चा होत आहे. 'जागृत पुणेकर' या नावाने हा बॅनर लावण्यात आला आहे. लोकसभा निवडणूकीच्या काळामध्ये उमेदवारांच्या प्रचाराचे बॅनर लावल्याचं आपण पाहिलेलं आहे. परंतु हे बॅनर काहीसं वेगळं आहे.

या बॅनरवर लिहिलंय की, जागृत पुणेकरांचं आवाहन. उमेदवार मग तो कोणत्याही पक्षाचा असू द्या, त्यांनी आपल्या परिचय पत्रकामधे एकच उल्लेख करावा. मी आमच्या पक्षाशी व पक्षाच्या ध्येय धोरणाशी आणि मतदारांशी 5 वर्ष प्रामाणिक राहीन, कोणत्याही दुसऱ्या पक्षात जाणार नाही. गेलो तर पुन्हा मला किंवा आमच्या घरातील व्यक्तींना निवडून देवू नका.

Pune : मुंढव्यात वाहनांना आग; वाहने पेटविल्याचा संशय

आजवर आपण अनेक राजकीय फ्लेक्स पाहिले आहेत. कधी नेत्यांच्या वाढदिवसाचे तर कधी राजकारण्यांच्या कुठल्या पदाच्या नियुक्तीचे फ्लेक्स लागतात. पण, पुण्यात एका असा एक फ्लेक्स लावण्यात आला  आहे, जो या नेते मंडळीला नक्की चिमटा काढून जात आहे. मी आमच्या पक्षाशी आणि मतदारांशी पाच वर्ष प्रामाणिक राहील. कोणत्याही दुसऱ्या पक्षात जाणार नाही, अशी हमी उमेदवारांनी द्यावी तरच त्याला मतदान केलं जाईल, असा पुणेरी सल्ला या फ्लेक्समधून देण्यात आला आहे.

विशेष म्हणजे हा फ्लेक्स कोणी लावला? कधी लावला, हे मात्र समजू शकलेलं नाही. हा बॅनर आता चांगलाच चर्चेत आला आहे. सध्या या बॅनरची चर्चा चांगलीच रंगली आहे. मागील वर्षी मोठी राजकीय उलथापालथ झाली. अनेक राजकीय नेत्यांनी वेगवेगळ्या पक्षांमध्ये प्रवेश केला त्यामुळे हा चिमटा काढण्यात आला आहे. ते नागरिकांना दिलेले वचने विसरले आहेत, याच पार्श्वभूमीवर हे बॅनर सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.

'सजग मतदार १०० टक्के मतदान' असं या बॅनरमध्ये लिहिण्यात आलं आहे. नागरिकांना पक्ष आणि धोरणाशी प्रामाणिक राहणारा उमेदवार हवा आहे, परंतु हे बॅनर कोणी लावला आहे, हे गुपित ठेवण्यात आलं आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply