Pune village Sold : गाव विकणे आहे; पुणेकरांनी चक्क गावच विकायला काढले, महापालिकेवर राेष

Pune village Sold : पुणे महापालिकेने निर्धारित केलेला कर आम्ही भरू शकत नाही. त्यामुळे आमचे गाव महापालिकेने विकत घ्यावे. आम्हांला जाचक कराच्या कारवाईतून मुक्त करावे अशी मागणी धायरी येथे झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी केली. काही युवकांनी  गाव विकणे आहे असे फलक देखील झळकविले आहेत.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानूसार पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये सोयी सुविधांचा प्रचंड अभाव आहे. त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून महापालिका सक्तीने आणि तिपटीने टॅक्स वसुली करत आहे. गावातील अनेक बांधकामे अनधिकृत ठरवत महापालिकेकडून सर्रासपणे कारवाई केली जात आहे.

MPSC Exam : कृषी सेवा परीक्षेतील उमेदवारांना तात्काळ नियुक्ती द्या, विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

महापालिकेचा कर ग्रामस्थ भरू शकत नाही. त्यामुळे आमचे गावच महापालिकेने विकत घ्यावे. आम्हांला कराच्या कारवाईतून मुक्त करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास सुमारे 34 गावातील ग्रामस्थ आगामी काळातील निवडणुकांवर बहिष्कार टाकतील असा इशारा गावक-यांनी पुणे महापालिकेस दिला आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply